ETV Bharat / state

पालघरातील गणेश कुंड येथे दीपोत्सवानिमित्त आतषबाजी; विलक्षण नजारा पाहण्यासाठी लोकांची गर्दी

पालघर शहरात असलेले गणेशकुंड हे फक्त गणेश विसर्जनासाठी नसून सामाजिक सलोखा कायम राहावा, तसेच सर्वांनी एकत्रित येत सांस्कृतिक देवाणघेवाण करावी. या निमित्ताने हा दीपोत्सव प्रकाश सोहळा आयोजित करण्यात आला.

दीपोत्सव
author img

By

Published : Nov 13, 2019, 5:17 AM IST

Updated : Nov 13, 2019, 11:33 AM IST

पालघर - त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधत 'मी पालघरकर' समूहातर्फे मंगळवारी संध्याकाळी शहरातील श्री गणेश कुंड तलाव परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण गणेशकुंड न्हाऊन निघाला. तसेच, यावेळी आतिषबाजी देखील करण्यात आली. हा अदभुत नयनरम्य आणि विलक्षण नजारा पाहण्यासाठी संपूर्ण पालघरकरांनी एकच गर्दी केली. त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमेच्या) या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, असूर शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून ठिकठिकाणी या दिवशी दिपोत्सव साजरा केला जातो.

दीपोत्सवाची दृष्ये
पालघर शहरात असलेले गणेशकुंड हे फक्त गणेश विसर्जनासाठी नसून सामाजिक सलोखा कायम राहावा, तसेच सर्वांनी एकत्रित येत सांस्कृतिक देवाणघेवाण करावी. या निमित्ताने हा दीपोत्सव प्रकाश सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजक संतोष चुरी यांनी म्हटले आहे. यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद पाहता पुढल्या वर्षीही असाच कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, असा विश्वास यावेळी मिलिंद साखरे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला नगरपरिषदेचे नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते यांनी कुटुंबासह आवर्जून हजेरी लावली.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांची नवीन ओळख 'महाराष्ट्र सेवक', CMO वर मात्र तोच फोटो

हा दीपोत्सव कार्यक्रम वात्सल्य जेष्ठ नागरिक संघ, पालघर प्रतिष्टान, यंग स्टार ट्रस्ट पालघर, संस्कार भारती पालघर, सोनोपंत दांडेकर कला क्रीडा अकादमी, दुर्गाना महिला मंडळ, राधा कृष्ण भागवत पालघर, मंगला महिला मंडळ, ओमकार महिला मंडळ, गुजराती सेवा मंडळ, जैन युवा ग्रुप, स्नेह संवर्धन महिला मंडळ, तनिष्का ग्रुप ऑफ पालघर, बालमित्र गणेशोत्सव मंडळ शुक्ला कंपाऊंड, आश्रम ग्रुप महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तम प्रतिसादात पार पडला.

Intro:पालघर गणेश कुंड येथे दीपोत्सवदरम्यान करण्यात आली आतषबाजी; विलक्षण नजारा पाहण्यासाठी पालघरकरांनी केली गर्दीBody:पालघर गणेश कुंड येथे दीपोत्सवदरम्यान करण्यात आली आतषबाजी; विलक्षण नजारा पाहण्यासाठी पालघरकरांनी केली गर्दी

नमित पाटील,

पालघर, दि. 12/11/2019

     त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधत मी पालघरकर समूहातर्फे मंगळवारी संध्याकाळी शहरातील श्री गणेश कुंड तलाव परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण गणेशकुंड न्हाऊन निघाला तसेच यावेळी आतिषबाजी देखील करण्यात आली. हा अदभुत व नयनरम्य, विलक्षण नजारा पाहण्यासाठी संपूर्ण पालघरकरांनी एकच गर्दी केली. त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमेच्या) या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, असूर शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणूनठिकठिकाणी दिपोत्सव साजरा केला जातो. 

    पालघर शहरात असलेले गणेशकुंड हे फक्त गणेश विसर्जनासाठी नसून सामाजिक सलोखा कायम राहावा तसेच सर्वांनी एकत्रित येत सांस्कृतिक देवाणघेवाण करावी या निमित्ताने हा दीपोत्सव प्रकाश सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजक संतोष चुरी यांनी म्हटले आहे. यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद पाहता पुढल्या वर्षीही असाच कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असा विश्वास यावेळी मिलिंद साखरे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला नगरपरिषदेचे नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते यांनी कुटुंबासह आवर्जून हजेरी लावली. 

    हा दीपोत्सव कार्यक्रम वात्सल्य जेष्ठ नागरिक संघ,पालघर प्रतिष्टान,यंग स्टार ट्रस्ट पालघर,संस्कार भारती पालघर, सोनोपंत दांडेकर कला क्रीडा अकादमी,दुर्गाना महिला मंडळ, राधा कृष्ण भागवत पालघर,मंगला महिला मंडळ, ओमकार महिला मंडळ,गुजराती सेवा मंडळ, जैन युवा ग्रुप, स्नेह संवर्धन महिला मंडळ तनिष्का ग्रुप ऑफ पालघर, बालमित्र गणेशोत्सव मंडळ शुक्ला कंपाऊंड, आश्रम ग्रुप महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तम प्रतिसादात हा दिपोत्सव पार पडला.

Conclusion:
Last Updated : Nov 13, 2019, 11:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.