विरार (पालघर) - श्री दत्त गुरू जयंती दिनाच्या निमित्ताने चित्रकार कौशिक जाधव यांनी औदुंबराच्या पानावर दत्त चित्र रेखाटले ( Datta Guru on Audumbara Leaf ) आहे. ही संकल्पना दत्तात्रेय ही तीन तोंडे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते.
दत्तगुरूचे चित्र साकारले -
गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार श्वान, मागे गाय असा परिसर दिसून येतो. स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ दिसतात. चार श्वान हे चार वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते.
शाळेत झाले कौतुक -
कौशिक जाधव हे मुळचे भाताने तालुका वसई येथील रहिवासी असून ते सध्या न्यू इंग्लिश स्कूल, वसई येथे कला शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. त्यांच्या चित्रांमुळे ते सबंध ते सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत. दगडांवरील क्रांतिकारांचे चित्र व फळभाज्यांवरील अष्टविनायक गणपती आणि आता त्यांनी दत्त जयंतीनिमित्त औदुंबराच्या पानावर श्री दत्तगुरुंचे चित्र साकारले आहेत. त्यांच्या या कलेचे कौतुक प्राचार्यांनी आणि शिक्षकांनी केले आहे.
हेही वाचा - Datta Jayanti 2021 : अमरावतीच्या झिरी येथे दत्त जयंती उत्सवाची 97 वर्षांपासूनची परंपरा