ETV Bharat / state

Jaipur Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील घटना कशी घडली? जीआरपीने गुन्ह्याचा प्रसंग पुन्हा केला उभा - GRP investigation team

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरण कसे घडले याचा जीआरपीकडूने तपास सुरू आहे. याप्रकरणी आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह हा जीआरपीच्या ताब्यात आहे. मंगळवारी जीआरपीच्या टीमने मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये जाऊन गोळीबार झालेल्या डब्यांची तपासणी केली. तसेच घटनेचे दृश्य पुन्हा तयार करण्यात आले.

आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह
आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह
author img

By

Published : Aug 9, 2023, 7:48 AM IST

मुंबई: जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये 31 जुलै रोजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन कुमार सिंहने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह 3 प्रवाशांची हत्या केली होती. याप्रकरणी सरकारी रेल्वे पोलीस तपास करत असून त्या गोळीबाराची घटना कशी घडली याचे दृश्य पुन्हा उभे केले. चौकशीचा भाग म्हणून जीआरपीच्या पथकाने कारशेडमध्ये असलेल्या जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये घटना कशी घडल्या प्रसंग रीक्रिएट केल्याची माहिती एका तपास अधिकाऱ्याने दिली.

ट्रेनच्या डब्यांचा दौरा: गोळीबाराची घटना जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस घडली होती. ही रेल्वे मुंबईतील सेंट्रल कारशेडमध्ये ठेवण्यात लावली आहे. या रेल्वेच्या ज्या डब्ब्यांमध्ये गोळीबाराची घटना घडली होती, त्या डब्ब्यांची पुन्हा तपासणी जीआरपीकडून करण्यात आली. बोरीवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या जीआरपी पथकाने या डब्ब्यात जाऊन घटना कशी घडली याचे दृश्य रीक्रिएट केले.

गुन्ह्याची घटना पुन्हा तयार करण्यात आली तेव्हा मुख्य साक्षीदार आणि रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जेथे वरिष्ठ, सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांच्यावर गोळी झाडण्यात आली. तसेच या रेल्वेच्या वेगवेगळ्या बोगीतून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंगने कशा गोळ्या झाडल्या याची घटना तयार करण्यात आली. परंतु घटनेचे दृश्य पुन्हा तयार करत असताना आरोपी चेतनकुमार सिंह हजर नव्हता. - तपास अधिकारी

पोलीस रिमांड वाढवणार:34 वर्षीय चेतन सिंह सध्या जीआरपीच्या अटकेत आहे. चेतनची पोलीस कोठडी वाढवण्यात यावी, अशी मागणी जीआरपीने न्यायालयाकडे केली आहे. कोठडी वाढवण्याच्या मागणीसह जीआरपीने आपल्या निवेदनात म्हटले की, आरोपीला घटनास्थळी घेऊन जाण्याची परवानगी द्यावी. तपास करणाऱ्या पथकाने रेल्वेमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केली आहेत. गोळीबार प्रकरणात अधिक माहिती मिळावी यासाठी ते फुटेज तपासले जात आहेत. तपास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान हत्येचा हेतू काय होता याची माहिती अजून मिळालेली नसल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

यादिवशी ट्रेनमध्ये झाला होता गोळीबार: 31 जुलैच्या दिवशी पहाटे जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस मुंबईच्या बाहेरील पालघर स्थानकाजवळ आली होती. त्यावेळी गोळीबारीची घटना घडली. रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वेची साखळी ओढून मीरा रोड स्टेशनला रेल्वे गाडी थांबवली. रेल्वे थांबल्याचे पाहताच आरोपी चेतन कुमार सिंह बंदुक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले.

हेही वाचा-

  1. Firing In Mumbai Jaipur Express : 'तो मानसिकदृष्ट्या आजारी होता, अधिकारी छळ करायचे';जवानाच्या कुटुंबियांचे धक्कादायक खुलासे
  2. Jaipur Mumbai Train Firing incident: सुरक्षा कर्मचारीच जर असे कृत्य करत असतील, तर याचा सखोल तपास झाला पाहिजे- मनिषा चौधरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.