ETV Bharat / state

पालघरमध्ये भाजपच्या दोन गटात राडा; नवरात्रोत्सवाच्या भर स्टेजवर झाली झटापट

आयोजकांकडून भाजप महापौर डिंपल मेहता यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, माजी महापौर गीता जैन यांचा सत्कार केला नाही. या कारणावरुन दोन्ही समर्थकांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.

पालघरमध्ये भाजपच्या दोन गटात राडा
author img

By

Published : Oct 3, 2019, 8:49 PM IST

पालघर - मिरा रोड येथे भाजपकडून नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला आहे. मिरारोडच्या शांतीनगर परिसरात हा भाजप नगरसेवक दिनेश जैन यांनी आयोजीत केला आहे. मात्र, यात भाजपच्या दोन गटात तुफान राडा झाला आहे. त्यामुळे मिरा भाईंदर येथील भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

पालघरमध्ये भाजपच्या दोन गटात राडा

हेही वाचा- जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे कुटुंबीय उपस्थित

महापौर डिंपल मेहता आणि माजी महापौर गीता जैन येथील कार्यक्रमात उपस्थित होत्या. यावेळी आयोजकांकडून भाजप महापौर डिंपल मेहता यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, माजी महापौर गीता जैन यांचा सत्कार केला नाही. या कारणावरुन दोन्ही समर्थकांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. मिरा भाईंदर शहरात भाजपमध्ये दोन गट तयार झाले आहेत. एक भाजप आमदार नरेंद्र मेहता तर दूसरा गट माजी महापौर व भाजप नगर सेविका गीता जैन यांचा आहे. नगरसेवक दिनेश जैन भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचे समर्थक आहेत. नगरसेवक दिनेश जैन यांनी मिरा रोडच्या शांतीनगरमधील गरबाचे आयोजन केले होते. यावेळी मंडळाच्या काही सदस्यांनी माजी महापौर गीता जैनला बोलावले होत. माजी महापौर गीता जैन यांच्या समर्थकांनी गीता जैन यांचा सत्कार करण्यासाठी संचालक मंडळाकडे निवेदन केले होते. परंतु, नगरसेवक दिनेश जैन यांनी गीता जैन यांचा सत्कार करायला नकार दिला. त्यामुळे भाजपच्या दोन गटांत राडा झाला.

हेही वाचा- राज्यात भाजप व शिवसेनेच्या विरुद्ध जनतेचा मोठा क्रोध : दिलीप वळसे-पाटील

विद्यमान आमदार नरेंद्र मेहता तसेच माजी महापौर व नगरसेविका गीता जैन यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती. पक्षाने नरेंद्र मेहता यांना भाजपची उमेदवारी १४५ मिरा भाईंदर विधानसभेतून दिली आहे. गीता जैनला पक्षाने तिकीट दिले नाही. परंतु, गीता जैन अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दोन गट एकमेकांच्या समोर आहेत. नगरसेवक दिनेश जैन यांची पत्नी सुनीता जैनच्या तक्रारीवरुन पूर्व महापौर गीता जैन व त्याच्या समर्थकांच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गीता जैनच्या समर्थकांनी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Intro:भाजपच्या दोन गटात राडा....भर स्टेजवर झाली झटापट ...Body:भाजपच्या दोन गटात राडा....भर स्टेजवर झाली झटापट ...

पालघर/भाईंदर - मिरा भाईंदर परिसरात भाजप मधील अंतः कलह चव्हाट्यावर आला आहे.मिरा रोड येथील नवरात्र उत्सवात भाजपच्या दोन गटात राडा पाहायला मिळाले.मिरारोडच्या शांतीनगर परिसरात भाजप नगरसेवक दिनेश जैन यांच्या नवरात्री उत्सवात भाजपच्या दोन गटात तुफान राडा झाली...महापौर डिंपल मेहता आणि माजी महापौर गीता जैन कार्यक्रमात उपस्थित झाले होते तर आयोजकांन कडून भाजप महापौर डिंपल मेहता यांचा सत्कार करण्यात आला तर माजी महापौर गीता जैन यांचा सत्कार केला नाही या कारणावरून दोन्ही समर्थकांन मध्ये शाब्दिक वाद सुरू झाला त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.मिरा भाईंदर शहरात भाजप मध्ये दोन गट तयार झाले आहेत. एक भाजप आमदार नरेंद्र मेहता तर दूसरा गट माजी महापौर व भाजप नगर सेविका गीता जैन यांचा आहे. नगरसेवक दिनेश जैन भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचा समर्थक आहे.नगरसेवक दिनेश जैन यांनी मिरा रोडच्या शांतीनगर मधील गरबा च्या आयोजन केले आहे. मंडळाच्या काही सदस्यांनी माजी महापौर गीता जैनला बोलावलं होता.माजी महापौर गीता जैन यांचा समर्थकांनी गीता जैन यांचा सत्कार करण्यासाठी संचालक मंडळ कडे निवेदन केले. परंतु नगरसेवक दिनेश जैन यांनी गीता जैन यांचा सत्कार करायला नकार दिली. त्यामुळे भाजपच्या दोघे गटांत राडा झाला.विद्यमान आमदार नरेंद्र मेहता तसेच माजी महापौर व नगरसेविका गीता जैन यांनी भाजप कडून उमेदवारीची मांगणी केली होती. पार्टिने नरेंद्र मेहता यांना भाजपचं उमेदवारी १४५ मिरा भाईंदर विधानसभेतुन दिली आहे. गीता जैनला पार्टीने तिकीट दिल नाही. परंतु गीता जैन अपक्ष निवडणूक लढण्याची तयारीत आहेत. त्यामुळे दोघे गट एक मेकांचे समोर आहेत.नगरसेवक दिनेश जैन यांची पत्नी सुनीता जैनच्या फिर्याद वरून पूर्व महापौर गीता जैन व त्याच्या समर्थकांन विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..तसेच गीता जैनच्या समर्थकांनी नया नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नया नगर पोलीस दोघांच्या गुन्हा नोंद करून घटनेचा तपास करत आहे.

बाईट:- दिनेश जैन, नगरसेवक भाजप ( नरेंद्र मेहता समर्थक) - गीता जैन, माजी महापौर व भाजप नगरसेविका

बाईट:- गीता सिंह, माजी महापौर गीता जैन समर्थक.

बाईट:- शांताराम वळवी, डीवाईएसपी मिरा रोड विभागीय पोलीस ठाणे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.