पालघर (वाडा) - तालुक्यात गुरुवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे शेतकरीवर्गाची खोळंबलेली शेतीची कामे पूर्ण करण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शेतात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे नांगरणी करून चिखल करण्यायोग्य पाऊस झाला. मात्र, दरम्यानच्या काळात काहींची भातपेरणी झाली नाही. तर, काहींनी उशीरा भात पेरणी केल्याने भातरोपे लागवडी योग्य झाली नाहीत. एव्हाना येथील शेतकरी आषाढी एकादशीनंतर भात लागवडीसाठी शेतात उतरत असतो. आता पावसाच्या जोरदार हजेरीमुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
वाडा तालुक्यासह पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी -
२७ जुन २०१९ - वाडा तालुक्यातील महसुली निहाय मंडळ विभागानूसार पावसाची नोंद वाडा मंडळ - ७१ मिमी. कोने-४४ मिमी. कुडूस-४८ आणि कंचाड मंडळाची २३ मिमी अशी नोंद झाली. ही पावसाची आकडेवारी २८ जुन २०१९ वाडा तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली.
तर, विक्रमगड तालुक्यात २७ जूनला दुपारच्या सुमारास महेंद्र पडघान या ८ वर्षीय मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्य झाल्याची घटना घडली आहे.