पालघर (वाडा) - तालुक्यातील सापने गावाजवळ गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून 60 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वाडा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे.
आयशर कंपनीचा ट्रकमध्ये (एम.एच 04 जे.यू 6429) गुटखा पदार्थ असल्याचा सुगावा वाडा पोलिसांना लागला होता. त्यानुसार वाडा पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे, उपनिरीक्षक प्रशांत सुबनावल व सहकारी धनगर गोंजारी आदी पोलीस कर्मचाऱयांनी सदर गाडीचा पाठलाग केला. सदर ट्रकची तपासणी केली असता गाडीतून 60 लाख मुद्देमालाचा गुटखा पकडण्यात आला. आरोपी इंतराज अली यास पोलीसांनी अटक केली असून हा मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील आहे.