पालघर - जिल्हा ग्रामीणमध्ये शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४ कोरोना रुग्ण आढळले असून हे सर्व रुग्ण वसई ग्रामीण भागातील आहेत. या रुग्णांमध्ये २ महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.
वसई तालुक्यातील कळंब येथील २८ व ५६ वर्षीय दोन महिला तसेच ५८ व ३२ वर्षीय पुरुष अशा एकूण चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे चारहीजण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते. दरम्यान, त्यांची चाचणी केली असता आज त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३५ कोरोनाबाधित रुग्ण अढळून आले असून त्यातील ६३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालघर तालुक्यातील ३, वसई ग्रामीण मधील २ अशा एकूण ५ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.