ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले ५ नवे कोरोनाबाधित रुग्ण - palghar covid 19 patient

कोरोनाबाधित व्यक्ती वेदांत हॉस्पिटल आयसीयूमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असून, वेदांत हॉस्पिटल येथे वसतिगृहात राहते. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.

palghar covid 19 update
पालघर कोरोना अपडेट
author img

By

Published : May 28, 2020, 7:06 PM IST

पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. प्राप्त झालेल्या अहवालानुसार या ५ नव्या रुग्णांमध्ये डहाणू तालुक्यातील १ आणि वसई ग्रामीणमधील ४ रुग्णांचा समावेश आहे. पालघर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८४ झाली असून, आतापर्यंत ४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आजवर ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वर्षीय २२ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित व्यक्ती वेदांत हॉस्पिटल आयसीयूमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असून, वेदांत हॉस्पिटल येथे वसतिगृहात राहते. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.

वसई ग्रामीणमध्ये ४ रुग्ण आढळून आले आहेत. वसई तालुक्यातील अर्नाळा येथील एसटीपाडा प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षणा दरम्यान ४१ वर्षीय महिला व ४६ वर्ष पुरुष अश्या दोघांमध्ये सारी आजााची लक्षणे आढळून आली. या दोघांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. तसेच तिवरी येथील १० वर्षीय मुलीला व ३३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे, त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.