पालघर - जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आपटी येथील नामदेव पाटील या शेतकऱ्याच्या शेतात शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत रब्बी हंगामातील तुर, वाल आणि आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेताजवळून उच्चदाबाची विद्युत तार गेली आहे. याच्याच शॉर्टसर्किटने आग लागल्याचे शेतकरी नामदेव पाटील सांगतात.
3 एकरात तुर,वाल,आंबा आणि इतर पिके घेतली होती. रब्बी हंगामातील ही पिके आता काढणीला आली होती. मात्र, शोतकऱ्याचा तोंडचा घास या आगीने हिरवला आहे. या आगीत त्यांनी शेतात काढलेल्या शेततलावाच्या ताडपत्रीही जळून गेल्या आहेत. शेततलावाच्या काठावरची ताडपत्री जळाल्याने ती निरुपयोगी बनली आहे. या आगीत शेतकऱ्याचे 3 ते 4 लाखाचे नुकसान झाले आहे. यासाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी वाडा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.