ETV Bharat / state

Oil Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड, पाहा VIDEO - palghar live news update

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाद्यतेल (गोड तेल) घेऊन जाणारा टँकरचा तवा व सोमटा या पालघर तालुक्यातील गावाजवळ अपघात ( Oil Tanker Accident ) झाला. अपघातानंतर टँकरमधून तेल गळती सुरू झाल्यानंतर तेल गोळा करुन घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांच्या झुंबड उडाली आहे.

Oil Tanker Accident
खाद्यतेलाचा टँकर पलटी
author img

By

Published : May 21, 2022, 3:28 PM IST

पालघर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाच्या टँकरचा अपघात झाला आहे. तेल गोळा करण्यासाठी भांडीकुंडी, हांडे, कॅन घेऊन स्थानिकांची झुंबड उडाली आहे. गळती होणारे तेल गोळा करण्यासाठी लगतच्या भागातील रहिवाशांनी घरातील भांडीकुंडी, हंडे, कॅन घेऊन अपघातग्रस्त ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाद्यतेल (गोड तेल) घेऊन जाणारा टँकरचा तवा व सोमटा या पालघर तालुक्यातील गावाजवळ अपघात झाला. अपघातानंतर टँकरमधून तेल गळती सुरू झाल्यानंतर तेल गोळा करुन घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांच्या झुंबड उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी द्रव्य रूपातील अमोनिया टँकरचा अपघात घडला होता. दरम्यान त्याच काही अंतरावर गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खाद्यतेल घेऊन जाणाऱ्या या ट्रकचा अपघात घडला आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास टँकर पलटल्यानंतर त्यामधून तेल गळती सुरू झाली असून तेल रस्त्यालगत खड्ड्यामध्ये गोळा होत आहे.

हेही वाचा - Lal Mahal : लाल महाल लावणी प्रकरण.. वैष्णवी पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.