पालघर Earthquake in Palghar : पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यात (२०१८)पासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रकार सुरू झालेत. डहाणू आणि तलासरी परिसरातील गावांना सतत भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे धक्के बसत असल्यानं सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालय. धुंदलवाडी, तलासरी, घोलवड, बोर्डी आणि इतर गावं भूकंपाच्या धक्क्यानं हादरलीत.
-
Earthquake of magnitude 4.1 on the Richter Scale strikes Arabian Sea at 9:52 pm: National Center for Seismology pic.twitter.com/Q44AZ85pIG
— ANI (@ANI) January 5, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Earthquake of magnitude 4.1 on the Richter Scale strikes Arabian Sea at 9:52 pm: National Center for Seismology pic.twitter.com/Q44AZ85pIG
— ANI (@ANI) January 5, 2024Earthquake of magnitude 4.1 on the Richter Scale strikes Arabian Sea at 9:52 pm: National Center for Seismology pic.twitter.com/Q44AZ85pIG
— ANI (@ANI) January 5, 2024
पूर्वीही झाला होता भूकंप : या अगोदर 3 जानेवारी रोजी दुपारी 1:47 वाजता पालघरच्या डहाणू तालुक्यातील काही भागात 3.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. दरम्यान, अधिकार्यांनी भूकंपाचं केंद्र नेमके कुठे आहे, हे स्पष्ट केलेलं नाही. तसेच, मागील वर्षी 2023 मध्येही पालघरमध्ये 3.5 आणि 3.3 तीव्रतेचे धक्के जाणवले होते. तसेच, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले होते. वारंवार भूकंप होत असल्यानं नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालय. तसंच, यावर काही उपाय निघणार नाही का असंही लोक विचारत आहेत.
नागरिक भयभीत : डहाणू, तलासरी परिसरात याआधी भूकंप सत्र सुरु होतं. त्या वेळी अनेक नागरिकांच्या घरांचं नुकसान झालं. यासाठी प्रशासनानं अनेक उपाय योजना देखील केल्या होत्या. मार्गदर्शन शिबीर आयोजित केली होती. नवीन वर्ष सुरू होताच 3 जानेवारी रोजी पुन्हा भूकंपांचे हादरे सुरू झाले असून नागरिकांमध्ये पुन्हा चिंतेचं वातावरण पसरलं आहे. धुंदलवाडी हे भूकंपाचं मुख्य प्रवण क्षेत्र असल्यानं या परिसरातील अनेक जवळील गावात काही घरांच्या भिंतींना हलक्याशा भेगा पडून तडा गेला आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा घाबरले आहेत. तसेच, या परिसरातील शाळकरी विद्यार्थी यांच्यात मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा :
1 स्वच्छ सर्वेक्षणात साताऱ्याचा डंका; पश्चिम विभागात कराड, पाचगणी नगरपालिका अव्वल
2 ठाण्यातील हवेचा दर्जा पुन्हा घसरला ; जाणून घ्या कोणत्या भागातील हवा आहे सर्वाधिक प्रदूषित
3 हॉलिवूड स्टार ख्रिश्चन क्लेपसरचा दोन मुलींसह विमान अपघातात मृत्यू