पालघर - जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरुच असून आज सकाळी ११.१४ वाजण्याच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, बोईसर, पालघर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ४.३ रीश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या परिसरात नोंदवण्यात आलेला हा आजवर बसलेला सर्वात मोठा भूकंपाचा धक्का आहे.
या भूकंपाचे धक्के गुजरातच्या उंबरगाव, वापी, सिल्वासापर्यंत जाणवले आहेत. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी नागरिकांच्या घरांना तडे गेले आहेत. आजच दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपामुळे पुन्हा एकदा पालघर परिसर हादरून गेला आहे.