ETV Bharat / state

बोईसर रेल्वे स्थानकावरील मालगाडीच्या डब्यात आढळला मृतदेह

पोलिसांना मृतदेहाच्या खिशात कागदपत्रे आढळली असून, त्यात एक आधारकार्ड सापडले. त्यावर सुबोध चंद्रकांत वोरव असे नाव असून त्यावर झारखंड येथील पत्ता आहे

author img

By

Published : Mar 7, 2019, 3:23 AM IST

बोईसर रेल्वे स्थानक

पालघर - बोईसर रेल्वे स्थानकावरील मालगाडीच्या डब्यात मृतदेह आढळला. मृतदेहाच्या खिशात असलेल्या आधारकार्डवरुन मृतदेहाची ओळख पटली. आधारकार्डवर सुबोध चंद्रकांत वोरव असे नाव असून ते झारखंडमधील रहिवासी होत.

पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये एका मालगाडीच्या डब्यातून माल खाली करत असताना एक मृतदेह आढळला. मृतदेह आढळलेली मालगाडी टाटानगर येथून आली होती. पोलिसांना मृतदेहाच्या खिशात कागदपत्रे आढळली असून, त्यात एक आधारकार्ड सापडले. त्यावर सुबोध चंद्रकांत वोरव असे नाव असून त्यावर झारखंड येथील पत्ता आहे, अशी माहिती बोईसर आर.पी.एफचे वरिष्ठ निरीक्षक वसंत राय यांनी दिली. तसेच शवाच्या शरीरावर रक्ताचे डाग असल्याचेही समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले व बोईसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी एडीआर दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बॉइसर एम.आय.डी.सी पोलिस करीत आहेत.

Intro:बोईसर रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये एका मालगाडीच्या डब्यात आढळले शव
खिशात अढळलेल्या आधारकार्डवर नाव सुबोध चंद्रकांत वोरव व पत्ता झारखंडBody:बोईसर रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये एका मालगाडीच्या डब्यात आढळले शव
खिशात अढळलेल्या आधारकार्डवर नाव सुबोध चंद्रकांत वोरव व पत्ता झारखंड

नमित पाटील,
पालघर,दि.6/2/2019,

पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये एका मालगाडीच्या डब्यातून माल खाली करत असताना या डब्यात एक अज्ञात इसमाचा शव आढळून आले. गाडीच्या डब्यात अज्ञात इसमाचे शव आढळल्याची बातमी सर्वत्र पसरताच एकच खळबळ उडाली.

शव अढळलेली मालगाडी टाटानगर येथून आली असून, या गाडीत एक शव आढळले असून त्याचे वय पंचवीस ते तीस वर्षाच्या आसपास आहे. पोलिसांना शवाच्या कपड्याच्या खिशात कागदपत्रे आढळली असून, त्यात एक आधारकार्ड सापडले आहे, त्यावर सुबोध चंद्रकांत वोरव असे नाव व झारखंड येथील पत्ता आहे.अशी माहिती बोईसर आर.पी.एफचे वरिष्ठ निरीक्षक वसंत राय यांनी दिली. तसेच शवाच्या शरीरावर रक्ताचे डाग असल्याचेही समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले व बोईसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी एडीआर दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बॉइसर एम.आय.डी.सी पोलिस करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.