पालघर/वसई - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तयार करण्यात आलेल्या उड्डाणपूलावर बेकायदेशीर जाहिरात फलक लावले जात आहेत. परंतु हे फलक हवेद्वारे मुख्य रस्त्याच्या मध्ये लोंबकळत असल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
वसई पूर्वेतील भागातून राष्ट्रीय महामार्ग गेला मध्ये महत्वाच्या शहरांना जोडणारे रस्ते व गावे असल्याने आहेत. त्यामुळे उड्डापुल तयार केले आहेत. या उड्डाणपुलाच्या खालील बाजूस विविध राजकीय पक्षाचे फलक, वाढदिवस शुभेच्छा, लग्नसमारंभ असे विविध फलक लावले जात आहेत.
हेही वाचा - शिरपूर तालुक्यात १४ लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त
हे फलक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तुटून महामार्गवर लटकत असतात. या अशा फलकामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जर हे बांधलेले फलक तुटून हवेद्वारे महामार्गवर आले तर मोठा अपघात घडण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. वसईतील घोडबंदरपासून ते सकवारपर्यंतच्या असलेल्या उड्डाणपुलांवर असे फलक अधून-मधून भररस्त्यात लोंबकळत असल्याचे दिसून येत आहेत. नुकताच महामार्गावरील शिरसाड उड्डाणपुलावर अशा लोळणाऱ्या फलकामुळे अनेक दुचाकी चालकांचे लक्ष विचलित झाल्याने अपघात होता होता वाचले.
यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र गायकवाड यांनी हा फलक बाजूला केला आहे. असे अनेक ठिकाणी फलक लटकत असून ते फलक महामार्ग प्राधिकरणाने वेळीच बाजूला करावे. तसेच, बेकायदेशीरपणे व बेजबाबदारपणे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - पर्यटकांसह ट्रेकर्सनी फुलला भीमाशंकर नाणेघाट