ETV Bharat / state

पालघर लोकसभेसाठी दलित पँथरचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा - पाठिंबा

पालघर लोकसभेसाठी दलित पँथरने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

दलित पँथरचे कार्यकर्ते
author img

By

Published : Apr 5, 2019, 7:51 PM IST

पालघर - दलित पँथर पक्षप्रमुख आणि केंद्रीय अध्यक्षा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, हा पाठिंबा कार्यकर्त्यांना अमान्य आहे. त्यामुळे त्यांनी पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

मल्लिका यांनी लोकसभेसाठी शिवसेना-भाजपला दिल्यामुळे त्यांचे पँथरचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पालघर लोकसभा जागेसाठी आपला पाठिंबा बहुजन विकास आघाडीला जाहीर केला.

दलित पँथरच्या कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद

विद्यमान सरकारच्या काळात भारतात दलित, मुस्लिम आणि आदिवासी अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विद्यमान सरकारचे अनेक मंत्री उघड-उघड संविधान बदलण्याची भाषा करतात. तसेच अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहेत. काहींची मजल तर संविधान जाळण्यापर्यंत सुद्धा गेली आहे. अच्छे दिनची स्वप्ने दाखवत मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या बँक अकाऊंटमध्ये १५ लाख रुपये टाकू, अशी आश्वासने दिली. मात्र, ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत. सरकार जनतेची फसवणूक केली. त्यामुळे अशा सत्ताधाऱ्यांना सेना- भाजपला पालघर लोकसभा मतदारसंघात मदत न करण्याचा निर्णय दलित पँथरने घेतल्याचे पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

या पत्रकार परिषदेसाठी बिंबेश जाधव (जिल्हा अध्यक्ष, पालघर), जगदिश राऊत (जिल्हा महासचिव) यासह अनेक दलित पँथरचे पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro: पालघर लोकसभेसाठी दलित पँथरचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर

दलित पँथर पक्षप्रमुख व केंद्रीय अध्यक्षा मलिका नामदेव ढसाळ यांनी जाहीर केलेला शिवसेना-भाजपला पाठिंबा कार्यकर्त्यांना अमान्यBody: पालघर लोकसभेसाठी दलित पँथरचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर

दलित पँथर पक्षप्रमुख व केंद्रीय अध्यक्षा मलिका नामदेव ढसाळ यांनी जाहीर केलेला शिवसेना-भाजपला पाठिंबा कार्यकर्त्यांना अमान्य

नमित पाटील,
पालघर, दि.5/4/2019,

दलित पँथर पक्षप्रमुख व केंद्रीय अध्यक्षा मलिका नामदेव ढसाळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी सेने-भाजपला जाहीर पाठिंबा दिला. परंतु हा पाठिंबा जाहीर करताना महाराष्ट्र कार्यकारणी व प्रमुख कार्यकर्त्याना विचारात न घेता घेतलेला निर्णय आहे. या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करीत असून, दलित पँथर महाराष्ट्र युनिटच्या कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयाविरोधात असंतोष आहे. असे दलित पँथर- महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांनी पत्रकार पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

दलित पँथरच्या वतीने पालघर लोकसभा मतदार संघात पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे प्रयत्न केले असता, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सोबत न जाता बहुजन विकास आघाडीला पाठिंबा पत्रकार परिषद घेत जाहीर केला आहे.

विद्यमान सरकारच्या काळात भारतात दलित, मुस्लिम व आदिवासी अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विद्यमान सरकारचे अनेक मंत्री उघडउघड संविधान बदलण्याची भाषा करतात, तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट व संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहेत. काहींची मजल तर संविधान जाळण्यापर्यंत सुद्धा गेली आहे. अच्छे दिन ची स्वप्ने दाखवत हे मोदी सरकार सत्तेवर आले, दोन कोटी रोजगार, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या बँक अकाऊंटमध्ये ही सारी आश्वासने दावे फोल ठरले हे सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. त्यामुळे आशा सत्ताधाऱ्यांना पालघर लोकसभा मतदारसंघात सेना- भाजपला मतदान व मदत न करण्याचा निर्णय दलित पँथरने घेतल्याचे दलित पँथर- महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी अविश राऊत (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष), बिंबेश जाधव (जिल्हा अध्यक्ष, पालघर), जगदीश राऊत (जिल्हा महासचिव), भरत महाले (जिल्हा कोषाध्यक्ष), संतोष कांबळे (जिल्हा सचिव),आयु. अरशद खान व आयु. भावेश दिवेकर(जिल्हा उपाध्यक्ष),आयु.चंदना जाधव(महिला जिल्हा अध्यक्ष) आदींसह दलित पँथरचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.