ETV Bharat / state

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक; मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तपासणी

author img

By

Published : Mar 26, 2021, 11:24 AM IST

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. मध्यंतरी कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र होते, त्यामुळे प्रशासनाने काहिसा सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, आता कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोना रूग्ण संख्येत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आसपासच्या राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे.

Corona Update
कोरोना अपडेट

पालघर - महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने सावधगिरीची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवासी व नागरिकांसाठी कोरोना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच त्यांना गुजरातमध्ये प्रवेश दिला जात आहे.

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे

भिलाडमध्ये होते प्रवासी आणि नागरिकांची तपासणी -

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या गुजरातमधील भिलाड येथे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांची तपासणी केली जात आहे. गुजरात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांमार्फत महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवासी व नागरिकांची कागदपत्रे तपासली जात आहेत. ज्या प्रवाशांकडे कोरोना RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे, अशांनाच गुजरातमध्ये प्रवेश दिला जात आहे. अन्यथा, महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातूनच त्यांना महाराष्ट्रात परत पाठवले जात आहे. मोठ्या प्रमाणात तपासणी होत असल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तपासणी नाक्याच्या परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

कर्नाटकनेही केल्या सीमा बंद -

महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. याचा धसका कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांनी घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाने बेळगावला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वच सीमा बंद केल्या आहेत. चिक्कोडी, कागवाड, संकेश्वर आणि निपाणी या तालुक्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. काटेरी झाडे आणि माती टाकून या सीमा बंद केल्या आहेत.

हेही वाचा - Exclusive कोरोनाचा धसका : कोल्हापूर-बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सीमा केल्या बंद

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.