पालघर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त Amrit Mahotsava Year of Independence आज राज्यभरात सामूहिक जन गन मन अभियान राबविण्यात आले. पालघर जिल्ह्यातही या अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. मात्र, पालघर तालुक्यातील चहाडे येथील पाटील कुटुंबाने आपल्यावर कोसळलेले. दु:ख बाजूला सारून राष्ट्राला प्रथम प्राधान्य दिल्याचे अनोखे चित्र पाहायला मिळाले.
पाटील कुटुंबीयांवर दुहेरी संकट चहाडे येथील रहिवासी गजानन काशिनाथ पाटील Gajanan Kashinath Patil यांच्या पत्नी कै. सुमित्रा पाटील यांचे गेल्या शुक्रवारी दि. 5 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाला आठवडाही उलटला नसताना स्वाती नरोत्तम पाटील, वय 35, Swati Narottam Patil या गजानन पाटील यांच्या नातीचेही अचानक निधन झाले. एकाच घरात असे दुःखाचे दुहेरी संकट आल्यामुळे पाटील कुटुंबीयांना उत्तरकार्याबाबत योग्य निर्णय घेता आला नाही.
प्रथम राष्ट्राला दिले प्राधान्य दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य सप्ताहाअंतर्गत राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, ते देशवासीयांत वृद्धींगत व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने बुधवारी सकाळी 11 वाजता सामूहिक जन गन मन अभियान Jan Gun Man Abhiyan राबविले. नेमक्या याच वेळेत सूर्यानदीच्या तीरी मासवण बंधार्यावर पाटील कुटुंबीयांकडून उत्तरकार्याची विधी सुरू होती. विशेष म्हणजे पाटील कुटुंबीयांनी ते थांबऊन सुख आणि दुःख आपलेच समजून उत्तरकार्याला क्षणभर विश्रांती दिली. प्रथम प्राधान्य राष्ट्राला दिले. यावेळी तेथे उपस्थित सर्वांनी वेळेत राष्ट्रगीत घेतले आणि नंतर उत्तरकार्य पूर्ण केले. पाटील कुटुंबीयांवर दु:खाचे डोंगर कोसळले असताना त्यांनी आपल्या राष्ट्राप्रती दाखवलेल्या आदराबद्दल पालघर जिल्ह्यासह राज्यभर त्यांचे कौतुक होत आहे.