ETV Bharat / state

पालघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन सकारात्मक - मुख्यमंत्री - HOSPITAL

पैशांअभावी एकाही रुग्णाला उपचारांपासून वंचित राहू देणार नाही...पालघरमधील अटल महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्र्यांची ग्वाही...पालघरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही स्पष्टीकरण...

वैद्यकीय महाविद्यालय
author img

By

Published : Mar 3, 2019, 10:17 PM IST

पालघर - अन्न, वस्त्र, निवारा या बरोबरच आता शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यादेखील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी आरोग्याची सुविधा सर्वांना मिळालीच पाहिजे. त्यामुळे एकही रुग्ण पैशांअभावी उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेत आहे. याच विचारातून पालघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वैद्यकीय महाविद्यालय

पालघरमध्ये अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाआरोग्य शिबिर ही सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणारी मोठी संकल्पना असून प्रत्येक गरजू व्यक्तीला आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी शासन तत्पर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. पालघर येथे जिल्हा रुग्णालयासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतही शासन सकारात्मक असून त्यासाठी लागेल तेवढी जागा देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Intro:पैशांअभावी एकाही रूग्णाला उपचारांपासून वंचित राहू देणार नाही.
पालघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन सकारात्मक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसBody:पैशांअभावी एकाही रूग्णाला उपचारांपासून वंचित राहू देणार नाही.
पालघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत शासन सकारात्मक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नमित पाटील,
पालघर,दि.3/2/2019

अन्न, वस्त्र, निवारा या बरोबरच आता शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या देखील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा आहेत. कुणालाही उपचारांची आवश्यकता भासू नये परंतु आवश्यकता भासलीच तर निधीअभावी कोणी वंचित राहू नये, याची दक्षता शासन घेत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, उद्योजक, नागरीक सीएसआर फंड आणि देणग्यांमधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी यावेळी करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महा आरोग्य शिबिर ही सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणारी मोठी संकल्पना असून प्रत्येक गरजू व्यक्तीला आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी शासन तत्पर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पालघर येथे जिल्हा रूग्णालयासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतही शासन सकारात्मक असून त्यासाठी लागेल तेवढी जागा देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पालघर येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.