नालासोपारा (पालघर) - नालासोपारा पश्चिमेकडील वाघोली गावात राहणारे केबल व्यवसायिकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शेतात कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येने संपूर्ण गावात खळबळ उडली आहे. सचिन नाईक असे मृत केबल व्यवसायिकाचे नाव आहे.
हेही वाचा - मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा - मुख्यमंत्री
हत्येचे कारण अस्पष्ट
मित्रानेच ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. कोयत्याने सात ते आठ वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते. घटनास्थळी नालासोपारा पोलीस आणि वसई क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी पोहचले आहे. ही हत्या नेमकी व्यावसायिक व्यवहारातून की अन्य कारणाने झाली याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा - अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला; उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय