ETV Bharat / state

पालघर पोलीस दलामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन

राज्यासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस दलामार्फत पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. बोईसर येथील टीमा सभागृह येथेपालघर पोलीस दलातर्फे मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पालघर पोलीस दलामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन
पालघर पोलीस दलामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन
author img

By

Published : Apr 6, 2021, 7:50 PM IST

पालघर - राज्यासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस दलामार्फत पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. बोईसर येथील टीमा सभागृह येथे
पालघर पोलीस दलातर्फे मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पंतगशाह कुटीर रुग्णालय जव्हार व जे जे हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर पार पडले.

रक्त संकलनासाठी पालघर पोलीस दलाचा पुढाकार

जिल्ह्यात विविध ठिकाणी पालघर पोलीस दलामार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार असून, याद्वारे 2000 रक्तपिशव्या संकलन करण्याचे उद्दिष्ट पालघर पोलीस दलाने समोर ठेवले आहे. त्यामुळे कोरोना काळात मागील वर्षभरापासून अहोरात्र आपले कर्तव्य बजावणारे पोलीस पुन्हा एकदा जनतेसाठी पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहे.

पालघर पोलीस दलामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन

विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या क्षेत्रातील बोईसर पोलीस ठाणे, वाणगाव पोलीस ठाणे, तारापूर पोलीस ठाणे या सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होउन रक्तदान केले आहे. या अगोदर पालघर पोलीस दलाकडून पालघर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज बोईसर येथील टीमा हॉलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. पुढील रक्तदान शिबिर जव्हार येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला बोईसर येथील विविध सामाजिक संघटना, शहरातील नागरीक तसेच स्वयंसेवकांनी चांगला प्रतिसाद देत, मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

हेही वाचा - नाशकात मिनी लॉकडाऊनला सुरूवात; बाजारपेठेत शुकशुकाट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.