ETV Bharat / state

शासकीय योजनेचा राजकीय लाभ! 'महाआरोग्य शिबिराचे श्रेय लाटण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न - fubnction

शासनाच्या निधीतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याची योग्य प्रसिद्धी करण्यासाठी भाजपच्या काही मंडळीनी खासगी बॅनर लावले असून पालघर शहरासह काही ठिकाणी हॅन्ड बिल वितरण करण्यात आले आहेत

शासकीय योजनेचा राजकीय लाभ
author img

By

Published : Feb 28, 2019, 11:53 PM IST

पालघर - शहरात येत्या 3 मार्चला "विनामूल्य भव्य अटल आरोग्य शिबिराचे" आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या आयोजनासाठी आदिवासी विभाग विकास विभागाकडून ९५ लक्ष रुपयांचे अर्थसाह्य घेण्यात आले आहे. असे असताना या शिबिराच्या आयोजनाचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न भाजपचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्याच्या नुतन प्रशासकीय इमारतीजवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या जाहिरात बोर्डवर भाजपचे चिन्ह कमळ आणि पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकवित हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत, पक्षाच्या फंडातूनच या शिबिराद्वारे रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत, असे भासवून येणाऱ्या निवडणुकीत "मतांची"गणिते आखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. पालघरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता भंग झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

हे शिबिर ३ मार्चला असून या आधीच जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांची तपासणी प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. या तपासणी प्रक्रियेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी भाजप कार्यकर्ते सरसावले असून या शिबिराच्या निमित्ताने मतदारानापर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष कार्यकर्ते धडपड करताना दिसत आहे.

या भव्य आरोग्य शिबिरासाठी आदिवासी विकास विभागाकडून तब्बल ९५ लक्ष रुपये मंजूर झाले असून या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच संपूर्ण वैद्यकीय विभाग कामाला लावण्यात आले आहे. या शिबिराच्या आयोजनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत ३ आढावा बैठक घेण्यात आल्या असून या बैठकांमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. यामुळे अनेक जिल्ह्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेच्या अनुषंगाने कामे करावी लागत असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्याकडून खाजगीत सांगण्यात येत आहे.

undefined

महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने येणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवेतील सलंग्न कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय तसेच खानपानाची सोय स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे. शिबिरासाठी अपेक्षित १ लाख रुग्णांना आणण्याची तसेच त्यांना पुन्हा परत घरी घेऊन जाण्याची जबाबदारी ठिकठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये "दिवंगत खासदार एडवोकेट चिंतामण वनगा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भव्य आरोग्य शिबिर" हे भाजप पक्षाच्या मार्फत आयोजित केले जात असल्याचा आभास निर्माण होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून होऊ लागले आहेत.

सर्व शासकीय शिबिराला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न

शासनाच्या निधीतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याची योग्य प्रसिद्धी करण्यासाठी भाजपच्या काही मंडळीनी खासगी बॅनर लावले असून पालघर शहरासह काही ठिकाणी हॅन्ड बिल वितरण करण्यात आले आहेत. या हँड बिलवर व फलकांवर फक्त भाजपाच्या नेत्यांची छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली असून या सर्व शासकीय शिबिराला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. हे शिबिर शासकीय आहे की भाजपतर्फे आयोजित करण्यात येत आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे.

undefined

या शिबिरासाठी पुरेशा संख्येत रुग्ण सहभागी होण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर सोपवण्यात आली आहे. मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ आगामी निवडणुकांमध्ये भाजपला व्हावा, हा छुपा अजेंडा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार

24 मार्च रोजी होणाऱ्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पालघरमध्ये २१ फेब्रुवारीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अशा वेळी भाजपाच्या एका माजी जिल्हा उपाध्यक्ष यांनी या शिबिराचे संयोजक असल्याचे परिपत्रक पालघर शहरात वितरित गेल्याने या कृतीमुळे आचारसंहिता बदल झाल्याची तक्रार काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी लावलेल्या माहिती फलकामधे अनेक स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी स्वतःला संयोजक म्हणून या शिबिराचे श्रेय घेण्याचा केविलवाणे प्रयत्न केल्याचेही उघडकीस आले आहे.

Intro:शासकीय योजनेचा राजकीय लाभ !
भाजपाचा महाआरोग्य शिबिराचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्नBody:शासकीय योजनेचा राजकीय लाभ !
भाजपाचा महाआरोग्य शिबिराचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न

Special Story
नमित पाटील,
पालघर, दि.28/2/2019

पालघर शहरालगत असलेल्या जिल्ह्याच्या नवीन प्रास्ताविक प्रशासकीय इमारतीलगत येत्या 3 मार्च रोजी "विनामूल्य भव्य अटल आरोग्य शिबिराचे" आयोजन करण्यात आले असून या शिबिराच्या आयोजनासाठी आदिवासी विभाग विकास विभागाकडून 95 लक्ष रुपयांचे अर्थसाह्य घेण्यात आले आहे. असे असताना या शिबिराच्या आयोजनाचे श्रेया उपटण्याचा प्रयत्न भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाच्या जाहिरात बोर्ड वर भाजपचे चिन्ह कमळ आणि पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकवित हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत, पक्षाच्या फंडातूनच या शिबिराद्वारे रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत असे भासवून येणाऱ्या निवडणुकीत "मतांची"गणिते आखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. पालघरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता भंग झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

३ मार्च रोजी पालघर येथे अटल आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, या शिबिरा पूर्वीची जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांची तपासणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या तपासणी प्रक्रियेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ने- आण करणे तसेच त्यांना गावा गावात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते सरसावले असून या शिबिराच्या निमित्ताने मतदारानापर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष कार्यकर्ते धडपड करताना दिसत आहेत.

आदिवासी विकास विभागाकडून या भव्य आरोग्य शिबिरासाठी तब्बल 95 लक्ष रुपये मंजूर झाले असून या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच संपूर्ण वैद्यकीय विभाग कालाला लावण्यात आले आहेत. या शिबिराच्या आयोजनाच्या निमित्ताने आजवर तीन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आल्या असून या बैठकांमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात येऊन बैठकांमधील चर्चेमध्ये हे पक्षीय मंडळी सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेक जिल्ह्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेच्या अनुषंगाने कामे करावी लागत असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्याकडून खाजगीत सांगण्यात येत आहे.

महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने येणारे डॉक्टर व इतर वैद्यकीय सेवेशील सलंग्न कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय तसेच खानपानाची सोय स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे. शिबिरासाठी अपेक्षित एक लाख रुग्णांना 3 मार्च रोजी आणण्याची तसेच त्यांना पुन्हा परत घरी घेऊन जाण्याची जबाबदारी ठिकठिकाणच्या भाजप कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये "दिवंगत खासदार एडवोकेट चिंतामण वनगा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित भव्य आरोग्य शिबिर" हे भाजपा पक्षाच्या मार्फत आयोजित केले जात असल्याचा आभास निर्माण होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून होऊ लागले आहेत.

शासनाच्या निधीतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत असून त्याची योग्य प्रसिद्धी करण्यासाठी भाजपाच्या काही मंडळीनी खाजगी बॅनर लावले असून पालघर शहरासह काही ठिकाणी हॅन्ड बिल वितरण करण्यात आले आहेत. या हँड बिलवर व फलकांवर फक्त भाजपाच्या नेत्यांची छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली असून या सर्व शासकीय शिबिराला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या शिबिरामध्ये सेवाभावी संस्थांनी सहभागी होऊन मदत करण्याचे आवाहन करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत देखील भाजपाच्या सदस्यांनी सूत्र हातात ठेवल्याने हे शिबिर शासकीय आहे की भाजपतर्फे आयोजित करण्यात येत आहे असा सवाल अनेक उपस्थितांच्या मनामध्ये उपस्थित झाला.

या शिबिरासाठी पुरेशा संख्येत रुग्ण सहभागी होण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर सोपवण्यात आली आहे. मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ आगामी निवडणुकांमध्ये भाजपला व्हावा, हा छुपा अजेंडा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

शासनाची योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा तसेच जिल्ह्यातील आरोग्य समस्या असलेल्या नागरिकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा मिळावी याकरिता भाजपाचे कार्यकर्ते गावागावात योजना व शिबिराचा लाभ होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे भाजपा पदाधिकारी यांनी याविषयी विचारणा केली असता नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार
24 मार्च रोजी होणाऱ्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पालघरमध्ये कालपासून (दिनांक 21 फेब्रुवारीपासून) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अशा वेळी भाजपाच्या एका माजी जिल्हा उपाध्यक्ष यांनी या शिबिराचे संयोजक असल्याचे परिपत्रक पालघर शहरात वितरित गेल्याने या कृतीमुळे आचारसहिता बदल झाल्याची तक्रार काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी लावलेल्या माहिती फलकामधे अनेक स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी स्वतःला संयोजक म्हणून या शिबिराचे श्रेय घेण्याचा केविलवाणे प्रयत्न केल्याचेही उघडकीस आले आहे.

पालघर मध्ये आयोजित होणारे महाआरोग्य शिबीर हे शासकीय असून त्याकरिता आदिवासी विकास विभागाकडून निधी घेण्यात आला आहे. या शिबिराशी कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नसून या शिबिराच्या आयोजनाचा कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधीकारी, पालघर

Byte- केदार काळे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
Photo- 1.आरोग्य शिबिराच्या बॅनरवर झळकणार भाजप कार्यकर्त्यांचे photo ,
2. घरोघरी वाटण्यात आलेले Pamplets

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.