पालघर - बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभेचे उमेदवार खासदार बळीराम जाधव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पालघर तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले.
मागील अनेक दिवसांपासून पालघर लोकसभेचा बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत महाआघाडी कडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, आज पत्रकार परिषदेद्वारे हितेंद्र ठाकूर यांनी जाधव हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यानंतर आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप जनता दल आणि महाआघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.