ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार - 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

देशात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. महाराष्ट्रातही रोज अशा घटना समोर येत आहेत. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात तळ्याची वाडी येथील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Abuse of a minor girl
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
author img

By

Published : Oct 12, 2020, 1:06 PM IST

पालघर- देशात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. महाराष्ट्रातही रोज अशा घटना समोर येत आहेत. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात तळ्याची वाडी येथील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पिडित मुलगी केस विंचरत असताना एका 26 वर्षीय नराधमाने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीस अटक केली आहे.

पिडित अल्पवयीन मुलगी आपल्या घराशेजारील गणेश दत्तू वाघ यांच्या घरी केस विंचरत होती. दरम्यान, त्यांच्या शेजारी असलेला आरोपी देवराम काळू भोई वय 26 वर्ष, याने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी 8 सप्टेंबर रोजी पिडीतेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

आरोपीवर भादंवी 376 ई, 452 सह लहान बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे 5 (जे) 2 , 5, (एल) 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास मोखाडा पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.