पालघर - अर्नाळा येथील एकाच कुटुंबातील 4 मच्छीमारांना अर्नाळा सागरी पोलिसांनी बुडताना वाचवले असून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
हेही वाचा - "आदित्य ठाकरेंना खुश ठेवण्यातच अजित पवारांसह सर्वांच भलं"
अर्नाळा किल्ल्यातील वैती येथील राजेश गजानन वैती (वय,34) परेश गजानन वैती (वय,38) निशा राजेश वैती (वय,25)वंदना परेश वैती (वय,28) हे सर्व जण रविवारी सकाळी साई इच्छा बोटीने मासेमारी साठी गेले होते. मासेमारी करून अर्नाळा किल्ला बंदरात परत येत होते. दरम्यान, चॅनल परिसरात त्यांची बोट आली असताना अचानक आलेल्या लाटेने चालकाचा सुकाणूवरील ताबा सुटला आणि लाटेच पाणी बोटीमध्ये शिरल्यामुळे बोटीचे इंजिन बंद पडले. बोट बुडण्याच्या स्थिती निर्माण झाली होती. यावेळी अर्नाळा सागरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सुभाष रामचंद्र मेहेर,पोलीस नाईक किशोर सुखदेव धनु, उदयराज यादव, खासगी बोटचालक निलेश मणचेकर यांनी अशोक या स्पीडबोटीच्या साहाय्याने त्या चारही मच्छीमारांना वाचवून सुखरुप किनाऱ्यावर आणण्यात आणले.