ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या १५० ट्रक चालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

author img

By

Published : Apr 4, 2020, 8:12 AM IST

लॉकडाऊनमुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अडकून पडलेल्या ट्रकचालक, क्लीनर यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडील पैसे संपल्याने जेवण ही उपलब्ध होत नाही.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लॉकडाऊन
लॉकडाऊनमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या १५० ट्रक चालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण देशात सतत प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांची आता चांगलीच अडचण झाली आहे. अनेक ट्रक चालक देशातील अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या १५० ट्रक चालक व काही आदिवासी कुटुंबाना अलर्ट सिटीझन फोरम मुंबई या संस्थेच्या मदतीचा हात पुढे करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

लॉकडाऊनमुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अडकून पडलेल्या ट्रकचालक, क्लीनर यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडील पैसे संपल्याने जेवण ही उपलब्ध होत नाही. शासन आणि मालकाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने सध्या मिळेल ते खाऊन हे दिवस काढत आहेत. मार्गावर अडकलेल्या दीडशे ट्रक चालकांना व आदिवासी कुटुंबाना अलर्ट सिटीझन फोरमचे अध्यक्ष निरंजन आहेर व सहकारी, कासा पोलीस ठाण्याचे एपीआय काळे व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते ट्रकचालक व आदिवासी बांधवांना तांदूळ, डाळ, साखर, चहापावडर साबण व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.