ETV Bharat / state

पोलीस अधिकाऱ्याने मुलाच्या वाढदिवसाचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला, जपली सामाजिक बांधिलकी - Vijaykant Sagar donate amount to cm relief fund

अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी जपली सामाजिक बांधिलकी मुलगा शौर्यच्या वाढदिवसाच्या खर्चाची रक्कम 14 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली.

additonal sp Vijayakant Sagar donate fund to cm relief fund
विजयकांत सागर यांनी जपली सामाजिक बांधिलकी
author img

By

Published : May 16, 2020, 8:20 AM IST

वसई(पालघर)- अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी मुलाच्या वाढदिवसाच्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. सागर यांनी त्यांच्या कृतीतून सामाजिक बांधिलकी जोपसली आहे.

विजयकांत सागर यांनी मुलगा शौर्य याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा न करता तो खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला. शौर्यच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त १४ हजारांचा धनादेश वसईचे प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे यांच्याकडे हस्ते सुपूर्द केला.

समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे नेहमी नवनवीन सामाजिक संदेश आपल्या कृतीतून देत असतात. यापूर्वी लॉकडाऊन काळात आपल्या मुलांचे केस स्वतः कापून घरीच राहा, सुरक्षित राहा हा संदेश दिला होता. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.