पालघर: सेवा विवेकच्या कार्यकर्त्यां राजकुमारी गुप्ता यांची अभिनेता सोनू सूद यांची ऊसगाव, विरार येथे भेट घेतली. चित्रीकरणासाठी आलेल्या अभिनेता सोनू सुद (Sonu Sood) यांनी सेवा विवेकच्या (Seva Vivek) सामाजिक कार्याची माहिती समजून घेतली. त्यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले. त्यांना सेवा विवेकचे माहितीपत्रक व आदिवासी महिलांनी बांबू हस्तकला द्वारे तयार केलेली वस्तू भेट देण्यात आली.
काय आहे सेवा विवेक सामाजिक संस्था? : सेवा विवेक सामाजिक संस्था आदिवासी महिलांना सन्मान व रोजगार मिळावा यासाठी पालघर जिल्ह्यात अनेक वर्षे काम करत आहे. संस्थेतल्या बऱ्याच महिला या संस्थेत काम करण्याआधी त्यांचे रोजगाराचे साधन शेतीकाम व घरकाम एवढेच होते. सेवा विवेक संस्थेसोबत जोडल्या गेल्यानंतर महिलांनी बांबू पासून बनणाऱ्या विविध हस्तकलेच्या वस्तूंचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर संस्थेतर्फे पुरवण्यात येणाऱ्या कच्चामालाद्वारे उत्तम दर्जेदार वस्तू तयार करण्यात महिलांनी हातखंडा मिळवला आहे. त्यामुळेच त्यांनी बनवलेल्या वस्तूंना देशभरातून मागणी असते. यामुळे या महिलांना आता उत्तम प्रकारे रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. तसेच महिला आपल्या मुलांचे शिक्षण तसेच घरातील विविध जबाबदाऱ्या स्वीकारू लागल्या आहेत. विवेक सेवा संस्थेच्या प्रयत्नांमुळे महिलांना रोजगार सोबतच सन्मानही मिळू लागला आहे.