पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात 4 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. प्राप्त झालेल्या अहवालानुसार या 4 नव्या रुग्णांमध्ये पालघर तालुक्यातील 3 आणि वसई ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे. पालघर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबधितांची संख्या 79वर पोहोचली असून आतापर्यंत 40 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आजवर 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पालघर तालुक्यात बुधवारी एकूण 3 नवीन कोरोनाबाधित आढळले असून, यात पालघर नगरपरिषद हद्दीत 2 व तारापूर येथे एक रुग्ण आढळला. वसई येथे पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या आणि पालघर नगरपरिषद हद्दीतील चार रस्ता, माहीम रोड येथील 31 वर्षीय व तुलसी प्लाझा येथील 43 वर्षीय अशा दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच तारापूर- पाटील कॉलनी येथील एका ३० वर्षीय महिला कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने या महिलेची कोरोना चाचणी केली असता, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वसई ग्रामीण भागात बुधवारी एक कोरोनाबाधित आढळला असून वसई तालुक्यातील तिवरी येथील रहिवासी ६५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले 4 नवे कोरोनाबाधित - total 79 corona cases in palghar
पालघर तालुक्यात बुधवारी एकूण 3 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, यात पालघर नगरपरिषद हद्दीत 2 व तारापूर येथे एक रुग्ण आढळला.
![पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळले 4 नवे कोरोनाबाधित palghar corona](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7375428-791-7375428-1590639124064.jpg?imwidth=3840)