ETV Bharat / state

20 हजारांची लाच घेणारा बोईसर पोलीस ठाण्यातील शिपायाला रंगेहात पकडले - bribe taken police boisar police station

बोईसर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या विलास काळेने तक्रारदाराचा एक ट्रक पास करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तडजोडी अंती 22 हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदाराने याप्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

police bribe case palghar
पोलीस शिपाई लाच
author img

By

Published : Dec 5, 2020, 5:51 PM IST

Updated : Dec 5, 2020, 7:26 PM IST

पालघर - 20 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एलसीबी) रंगेहात पकडण्यात आले आहे. विलास मंगेश काळे (वय 29) या लाचखोर पोलीस शिपायाचे नाव आहे. तो बोईसर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

20 हजारांची लाच घेणारा बोईसर पोलीस ठाण्यातील शिपायाला रंगेहात पकडले

ट्रक पास करण्यासाठी मागितली 25 हजारांची लाच -

विलास काळेने तक्रारदाराचा एक ट्रक पास करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तडजोडी अंती 22 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने याप्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची शहनिशा केली. तक्रारीत तथ्य आढल्यानंतर सापळा रचुन 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचखोर पोलीस शिपाई विलास काळे यास रंगेहात पकडले.

हेही वाचा - BREAKING: भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल

लाचखोर पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (संशोधन 2018) चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक विलास मते, पो.ना. सचिन मोरे, तानाजी गायकवाड, संदेश शिंदे, पो.शि अश्विनी राजपूत यांनी केली.

Last Updated : Dec 5, 2020, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.