ETV Bharat / state

आरिफ मोहम्मद अली शेख खूनप्रकरण; ११ जणांना न्यायालयीन कोठडी

अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख खून प्रकरणी ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरिफ मोहम्मद अली शेख
author img

By

Published : May 26, 2019, 10:40 AM IST

पालघर - अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख यांचा ९ मे रोजी खून झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने शनिवारी ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

न्यायालय

पालघर न्यायालयाचे सह न्यायाधीश एस. जे. लाड यांनी सरकारची आणि आरोपीच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर ही कोठडी सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व आरोपींची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणातील ११ आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सह न्यायाधीश एस. जे. लाड यांच्या समोर झालेल्या सुनावणीत त्यांनीही या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

अल्फा मेटल कंपनीचे मालक मोहम्मद अली शेख यांचे अपहरण करुन खून केल्याचा प्रकार ९ मे रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी आधी ४ आणि नंतर ७ आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, यातील एका आरोपीने आत्महत्या केली. यानंतर हत्या प्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणांमध्ये अजून तपास बाकी असून तो तपास पूर्ण करण्यासाठी या आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांमार्फत न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Intro:अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख खून प्रकरणी अकरा आरोपींना सुनावली न्यायालयीन कोठडीBody: अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख खून प्रकरणी अकरा आरोपींना सुनावली न्यायालयीन कोठडी

नमित पाटील
पालघर, दि.25/5/019

अल्फा मेटल कंपनीचे मालक आरिफ मोहम्मद अली शेख यांच्या खून केलेल्या आरोपींना अधिक तपासासाठी पालघर पोलिसांनी पोलिस कोठडीत वाढ देण्याची मागणी केली होती. पालघर न्यायालयाचे सह न्यायाधीश एस. जे. लाड यांनी या आरोपींना सरकारी बाजू व आरोपीच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर ही कोठडी सुनावली.या सर्व आरोपींची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे. याआधी या प्रकरणातील अकरा आरोपीना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सह न्यायाधीश एस. जे. लाड यांच्या समोर झालेल्या सुनावणीत त्यांनीही न्यायालयीन कोठडी सुनावली.

9 मे रोजी अल्फा मेटल कंपनीचे मालक मोहम्मद अली शेख यांचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आधी चार व नंतर सात आरोपी अटकेत होते. त्यातील एका आरोपीने आत्महत्या केलेली आहे. या प्रकरणात पुढे काय होणार याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली होती. या हत्या प्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले व या प्रकरणांमध्ये अजून तपास बाकी असून तो तपास पूर्ण करण्यासाठी या आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांमार्फत न्यायालयाकडे करण्यात आली.तसेच आरोपींच्या वकीलानीही यावेळी युकीतवाद केला.त्यानंतर न्यायालयाने या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.