ETV Bharat / state

डहाणू - नाशिक रोडवर वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो उलटला, एकाचा मृत्यू, २२ गंभीर जखमी - Road accident in Palghar

जखमींना उपचारार्थ कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

10 to 15 people injured in Road accident in Palghar
कासा-जव्हार मार्गावर वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो उलटला; १० ते १५ जण जखमी
author img

By

Published : Mar 14, 2020, 1:10 AM IST

Updated : Mar 14, 2020, 2:04 AM IST

पालघर - डहाणू - नाशिक रोडवरील वेती येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पो उलटल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. डहाणूमधील गंजाड येथून लग्न कार्यक्रम आटोपून विक्रमगड सातखोर येथे जाणारा भरधाव पिकअप टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने डहाणू - नाशिक रोडवरील वेती येथे पलटी झाला.

अपघाताच्या वेळी या पिकअपमध्ये टेम्पोमध्ये जवळपास ४० वऱ्हाडी होते. यातील एकाचा मृत्यू झाला असून, नाना चोथे (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अपघातात २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कासा-जव्हार मार्गावर वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो उलटला; 10 ते 15 जण जखमी

यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर एकाला गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या मार्गावर वारंवार अपघाताची मालिका सुरूच असून याच ठिकाणी दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात २ तरुणांचा देखील मृत्यू झाला होता.

Last Updated : Mar 14, 2020, 2:04 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.