उस्मानाबाद - ऑनलाईन रम्मीमध्ये झालेले नुकसान आणि यातून आलेल्या नैराश्यातून एका सुशिक्षित तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना उस्मानाबादमधील हिंगळजवाडी तालुका येथे ८ ऑगस्ट रोजी घडली. श्रीकृष्ण हरी भोसले (२५) असे या तरूणाचे नाव आहे.
इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्य श्रीकृष्ण या तरूणाला ऑनलाईन रम्मी खेळण्याचे व्यसन लागले होते. हा तरूण मोबाईलवरून ऑनलाईन जंगली नावाचा रम्मी जुगार खेळत होता. या खेळात त्याचे पैसे गेले. त्यामुळे हताश होऊन त्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास स्वतःच्या घरात पत्र्याच्या लोखंडी आडूला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ए. एस. आय. डी. एम चव्हाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी चुलत भाऊ धनाजी भोसले यांच्या तक्रारीवरून ढोकी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.