उस्मानाबाद -दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनीलोकसभेचे उमेदवार घोषित केले आहेत. शिवसेनेकडूनतालुक्याचे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. यामुळे उस्मानाबाद मतदारसंघात दोन भावात होणार लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सुटत नव्हता. या दोन्ही पक्षात अंतर्गत गटबाजीचे प्रमाण वाढले होते. एकीकडे पाटील घराण्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात येत होता. दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांची ओळख निष्क्रिय खासदार म्हणूनच झाली होती. त्यामुळेच गायकवाड यांना डच्चू देऊन ओमप्रकाशराजेनिंबाळकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.
ओमप्रकाशराजेनिंबाळकर यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. ओमप्रकाशराजेनिंबाळकर व राणा जगजितसिंह पाटील या भाऊ बांधिलकीमधील लोकसभेची लढाई कोण जिंकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.