ETV Bharat / state

तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ... - मंचकी निद्रा तुळजाभवानी

ही निद्रा शास्त्रानुसार कृष्ण अष्टमी ते अमावस्येपर्यंत असते. नवरात्रामध्ये महिषासूर राक्षसाबरोबर युध्द कसे करावे, याची घोर (चिंता) देवीला लागते म्हणून या निद्रेस घोर निद्रा असे संबोधतात.

उस्मानाबाद
उस्मानाबाद
author img

By

Published : Oct 10, 2020, 9:13 PM IST

उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी देवीला अभिषेक झाल्यानंतर देवीची मूर्ती सिंहासनावरून काढून चांदीच्या पलंगावर मंचकी निद्रा घेण्यासाठी गाभाऱ्यातून बाहेर काढण्यात आली.

तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ...

या घोर निद्रेस प्रारंभ झाला, ही निद्रा भाद्रपद कृष्ण अष्टमीस सुरुवात होते. परंतु, अधिक अश्विन असल्यामुळे अश्विन कृष्ण अष्टमीस तुळजाभवानीची मंचकी निद्रा करण्यात आली. ही निद्रा शास्त्रानुसार कृष्ण अष्टमी ते अमावस्येपर्यंत असते. नवरात्रामध्ये महिषासूर राक्षसाबरोबर युध्द कसे करावे, याची घोर (चिंता) देवीला लागते म्हणून या निद्रेस घोर निद्रा असे संबोधतात.

आजपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत तुळजापुरातील सर्व पुजारी वर्ग, स्थानिक लोक पलंगावर निद्रा करीत नाहीत. गादी उशी याचा उपयोग करीत नाहीत. यावर्षी पहिल्यांदा गावात भाविकाविना नवरात्र होत आहे. शनिवार १७ ऑक्टोबरला पहाटे देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होईल. त्यानंतर सकाळी अभिषेक करून त्यानंतर दुपारी १२ वाजता घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाला सुरुवात करण्यात येते. आज मंचकी निद्रेच्या वेळी देवीचे मुख्य महंत भोपे पुजारी, पाळीकर पुजारी, अधिकारी मंदिर व्यवस्थापक कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - 'अजित पवारांना दाखवून द्या, आम्ही पण तुमचे बाप आहोत'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.