ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये ट्रक-पिकअपची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 17, 2019, 8:06 PM IST

उस्मानाबादमधील औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय बायपास महामार्गावर डी मार्ट समोर आज ट्रक आणि पिकअप वाहनांचा जोरदार अपघात झाला.

अपघातग्रस्त पिकअप गाडी

उस्मानाबाद - शहराच्या जवळील औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय बायपास महामार्गावर डी मार्ट समोर आज ट्रक आणि पिकअप वाहनांचा जोरदार अपघात झाला. या अपघातात २ युवकांचा जागीच मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे.

घटनास्थळावरील दृश्ये

उस्मानाबाद तालुक्यातील घोगरेवाडी येथील युवक तुळजापूरला भाजीपाला खरेदी करण्यासाठी निघाले होते. पिकअप (एम एच २४ जे ५९०६ डी) डी मार्ट जवळ आल्यानंतर ट्रक (एम एच १२ एच बी ६६४५) ने मागून जोरात धडक दिली. या अपघातात दादासाहेब व्यंकट झांजे (२०) आणि रमेश श्रीकृष्ण झांजे (२१) यांचा मृत्यू झाला. तर सुरज शिवाजी साळुंखे (२६) हे जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा गंभीर होता की पिकअप पूर्ण उलटा होऊन याची दोन्ही चाके निखळली आहेत.

Intro:ट्रकची आणि पिकअपची समोरासमोर धडक दोघांचा जागीच मृत्यू

उस्मानाबाद - शहराच्या जवळ औरंगाबाद - सोलापूर या राष्ट्रीय बायपास महामार्गावर ट्रक आणि पिकअप या वाहनांचा जोरदार अपघात झाला डी मार्ट च्या समोर ट्रकने पिकअप दिलेल्या धडकेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. उस्मानाबाद तालुक्यातील घोगरेवाडी येथील युवक तुळजापूरला भाजीपाला खरेदी करण्यासाठी निघाले होते. पिकअप (एम-एच 24 जे 5906 डी) डी मार्ट जवळ आल्यानंतर ट्रक ( एम एच 12 एच बी 6645) ने मागून जोरात धडक दिली. या अपघातात  दादासाहेब व्यंकट झांजे( वय 20) व रमेश श्रीकृष्ण झांजे (वय 21) हे मृत झाले असून सुरज शिवाजी साळुंखे (वय 26) हे जखमी आहेत. हा अपघात एवढा गंभीर होता की पिकअप पूर्ण उलटा होऊन याची दोन्ही चाके निखळली गेलीBody:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.