ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये सेल्फीच्या नादात बोट उलटली; तिघांचा मृत्यू - fort

घटनास्थळ
author img

By

Published : Apr 20, 2019, 2:40 PM IST

Updated : Apr 20, 2019, 4:45 PM IST

2019-04-20 14:37:04

नळदुर्ग किल्ल्यात बोटिंग करताना बोट उलटली

उस्मानाबाद - जिल्ह्यातील नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात बोरीनदीत बोटींग करताना सेल्फी घेतेवेळी बोट उलटल्याची घटना घडली. यामध्ये ३ लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळच्या  सुमारास घडली. मृतांमध्ये २ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.

पुरातत्व खात्याशी करार करून किल्ला देखभाल करणाऱ्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी यांचे हे नातलग असल्याचे सांगितले जात आहे. या मृत लहान मुलांमध्ये सानिया फारुक काझी (वय ९), ईझान एहसान काझी (वय ७), अलमास शफीक जहागिरदार (वय १०, रा. नळदुर्ग) असे पाण्यात बुडालेल्यांची नावे आहेत.

शनिवार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील किल्ल्याजवळच असलेल्या काझी गल्लीतुन आठ ते दहा मुले-मुली किल्ला पाहण्यासाठी निघाले. हे सर्व युनिटी कंपनीचे संचालक कफील मौलवी यांचे नातलग असल्याने तिकीट काढण्याचा प्रश्न नाही. या मुलांनी किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर बोटींगचा आनंद लुटण्यासाठी बोटींगमध्ये आठजण बसले. बोट सुरू होऊन बोरी नदीच्या काठाकडे जात असताना एका मुलाने सेल्फी घेण्यासाठी जागेवरून उठून पुढे गेला. त्यापाठोपाठ काही मुले आल्याने बोटीचा तोल जात असल्याने गोंधळ उडाला. यातच वरील तिघे बोरी नदीच्या पात्रात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शी घटना पाहणाऱ्यांनी सांगितले.

घटनेनंतर सानिया या मुलीस पाण्याबाहेर तातडीने बाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. मात्र, सानियाचे उपचारापूर्वी निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तीन ते चार तासानंतर अलमास हिचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. तर ईझानचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

Intro:Body:

adssad

Conclusion:
Last Updated : Apr 20, 2019, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.