उस्मानाबाद आंध्र प्रदेशातील अनोळखी इसमांनी 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सांजा चौक, उस्मानाबाद येथील बालगृहात असलेल्या बालकांना, बनावट आधार ओळखपत्र व जन्म दाखल्यांच्या सहायाने ताब्यात घेऊन basis of fake documents त्या बालकांचे अपहरण करण्याचा प्रयत्न trying to kidnap children केला होता. बालकल्याण समिती अध्यक्ष विजकुमार माने यांनी दिलेल्या प्राथमिक माहीती वरुन, तक्रार नोंदविली होती. त्यावरुन तीन आरोपींना अटक Three accused करण्यात आली आहे. Three accused trying to kidnap children
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पवार, संदीप ओहोळ, साईनाथ आशामोड, वैशाली सोनवने, रंजना होळकर यांच्या पोलीस पथकाने 6 सप्टेंबर रोजी सांजा रोड, उस्मानाबाद येथील बालकल्याण समीती अध्यक्ष विजयकुमार माने यांच्याशी संपर्क साधला. सांजा रोड परिसरातून एस. लक्ष्मी कृष्णा हिला ताब्यात घेतले. या महिलेची चौकशी केली असता, ती पोलीसांना समाधानकारक उत्तरे देत नव्हती. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. या महीलेकडे 03 बनावट आधार कार्डसह, चोरीचा एक मोबाईल व 42,000 रुपये रोख रक्कम सापडली आहे.
तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात एस. लक्ष्मी कृष्णा या महीलेकडे सैपडलेल्या मोबाईलवरुन पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण करुन, उस्मानाबाद शहरातील पोतदार इंटरनॅशनल स्कुल समोरील राष्ट्रीय महामार्गवरुन तीच्या दोन पुरुष साथीदारांना ताब्यात घेतले. पोलीसांनी त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी आपली नावे एस. कृष्णा उर्फ गंगाधार सुभाराव (वय 45 वर्षे) व एस. साई व्यंकटेश (वय 28 वर्षे)असल्याचे सांगीतले. पोलीसांनी त्यांचा अधिक तपास केला असता, त्यांच्या ताब्यात 02 बनावट आधार कार्ड, चोरीचे 5 मोबाईल व बनावट वाहन परवान्यासह, एक बोलेरो पिकअप मिळाल्याचे पोलीसांनी सांगितले.
तीघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी तिन्ही आरोपीं कडे मिळालेल्या सर्व गोष्टी हस्तगत करुन, त्या तीघांस आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपीतांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्या तीघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे हे करत आहेत. अपहरण केलेल्या मुलांचा वापर स्मार्टफोन चोरी करण्यासाठी केला जात असल्याचा पोलीसांना संशय आहे. Three accused trying to kidnap children