उस्मानाबाद - 'वर्ल्ड वाईड वेब' या वेबसाईटला मंगळवारी ३० वर्ष पूर्ण झालेत. १२ मार्च १९८९ साली डब्लू.डब्लू.डब्लू. या वेबसाईटची सुरवात झाली. 'सर टीम बर्नरस ली' यांनी ही वेबसाईट सुरू केली.
रेल्वेचे वेळापत्रक दाखवण्यासाठी या वेबसाईटची सुरूवात झाली होती. मात्र, आज या वेबसाईटवर जगातील कुठलीही माहिती उपलब्ध आहे. कोणतीही माहिती मिळवण्यासाठी सर्वात जास्त वापर या वेबसाईटचा केला जातो. या वेबसाईटच्या निर्मिती नंतर तब्बल ९ वर्षांनंतर उस्मानाबाद येथे या वेबसाईटचा वापर सुरू करण्यात आला, अशी माहिती जिल्ह्यातील सर्वात जुने बीई.कॉम्प्युटर इंजिनिअर असलेले रमेश मेंढे यांनी दिली. १९९८ पासून या डब्ल्यू.डब्ल्यू.डब्ल्यू. या वेबसाईटचा वापर करण्यास सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले.
रमेश मेंढे यांचा व्हिडिओ एडिटिंग आणि फोटो डिझाईन चा व्यवसाय आहे. १९९८ साली जिल्ह्यात इंटरनेचे जाळे म्हणावे तसे नव्हते त्यावेळी बीएसएनएल या इंटरनेट कनेक्शनचा वापर करून मेंढे या वेबसाईटच वापर करायचे. मेंढे सांगतात की आम्ही ज्यावेळी ही वेबसाईट वापरायचो त्यावेळी नेटचा स्पीड कमी असायचा. त्यामुळे कुठलीही माहिती मिळवण्यासाठी वेळ लागायचा मात्र आज ही वेबसाईट काही क्षणात ओपन होते. आज या वेबसाईटचे जाळे सर्वत्र आहे.