ETV Bharat / state

उस्मानाबाद लॉकडाऊन : वेळेचा सदुपयोग, व्यावसायिकाने स्वत:मधला केला जागा चित्रकार

उस्मानाबाद शहरातील बाळासाहेब आणदूरकर यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. मात्र, लॉक डाऊनमुळे ते सध्या बंद असून आता रिकामा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. हाच प्रश्न इतरांच्या मनात आहे मात्र, बाळासाहेबांनी या रिकाम्या वेळेत त्यांच्यात असलेला चित्रकार जगावण्याचा प्रयत्न केला.

author img

By

Published : Apr 6, 2020, 2:27 PM IST

रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून व्यावसायिकाने स्वत:मधला चित्रकार केला जागा

उस्मानाबाद - कोरोना विषाणूने भारतात थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर दक्षता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याची घोषणा केली. त्यानंतर हातावर पोट असलेल्या मजुरांना काम बंद झाले. तर, लहानसहान व्यवसायिकांना आपले व्यवसाय ठप्प करावे लागले. या बंदमुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे लॉक डाऊनची ही सुवर्णसंधी म्हणून काही जण रिकाम्या वेळेचा उपयोग आपला छंद जोपासण्यासाठी करून घेत आहेत.

उस्मानाबाद शहरातील बाळासाहेब आणदूरकर यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. मात्र, आज घडीला ते कुलूप बंद असून आता रिकामा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. बाहेर फिरता येत नाही आणि व्यवसाय बंद, त्यामुळे दिवस कसे घालायचे असा गंभीर प्रश्न बाळासाहेबांच्या पुढे होता. हाच प्रश्न इतरांच्या मनात आहे मात्र, बाळासाहेबांनी या रिकाम्या वेळेत त्यांच्यात असलेला चित्रकार जगावण्याचा प्रयत्न केला.

आणदूरकर यांना लहानपणापासून चित्रकलेची प्रचंड आवड त्यांचे शिक्षणही यामध्ये झाले. मात्र, घरच्या परिस्थितीने त्यांना या क्षेत्रात करिअर करता आले नाही. मात्र, या 21 दिवसांच्या लॉक डाऊनचा सदुपयोग करण्याचे त्यांनी ठरवले. लॉक डाऊन झाल्यापासून बाळासाहेब आंदूरकरांनी वेगवेगळ्या विचारवंतांची, साहित्यिकांची, महापुरुषांची चित्रे रेखाटली आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांचा लहान मुलगा आणि त्यांच्या बहिणीच्या मुलीदेखील असतात. या तिघांना आणदूरकर दररोज वेगवेगळे पेंटिंग काढायला लावतात. निसर्गचित्र असेल प्राणी चित्र असेल असे वेगवेगळे चित्र दिवसभर या मुलांकडूनही काढून घेतात आणि त्यांचाही विरंगुळा करतात.

कोरोना विषाणूमुळे शाळेला लवकरच सुट्ट्या देण्यात आल्या. तर, संचारबंदी असल्याने मुलांना बाहेर घेऊन जाताही येत नाही. दिवसभर घरातच असल्याने मुली कंटाळून जात आहेत. त्यामुळे बाळासाहेबांनी स्वत: मधला कलाकार जागृत करून मुलांनाही चित्रकलेची आवड निर्माण करून त्यांचीही करमणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.