उस्मानाबाद- जिल्ह्यातील कारी या गावात एका तरुणाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधी व्हावी या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन केले. अमोल जाधव असे त्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे गावातील नेते, पुढारी निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. पॅनल उभा करणे, मतदारांच्या गाठीभेटी घेणे अशाप्रकारे दिवसागणिक निवडणुकीची चुरस वाढत चालली आहे. राज्य सरकारकडूनही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी विविध बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील कारी या गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधी व्हावी या मागणीसाठी एका तरुणाने शोले स्टाईल आंदोलन केले. अमोल जाधव असे त्या तरुणाचे नाव आहे.
तरुणाचा लेखी आश्वासनाचा हट्ट
अमोल पहाटे ६ वाजताच गावातील मोबाईल टावर चढून बसला आणि जोपर्यंत गावकऱ्यांकडून ग्रामपंचायत निवडणून बिनविरोधी करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा त्याने घेतला होता. अखेर पोलीस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी अमोलची समजूत काढून कसेबसे त्याला खाली उतरवले आणि आपल्या ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा- शिवसेना आमदार पूत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल
हेही वाचा- पुण्यात पुन्हा एल्गार परिषद.. 31 डिसेंबरला परिषदेच्या आयोजनाबाबत पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज