ETV Bharat / state

उस्मानाबादेत शिवसेनेला धक्का, अजित पिंगळेंचा भाजपमध्ये प्रवेश - अजित पिंगळेंचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अजित पिंगळे यांची ओळख होती. मात्र, प्रामाणिक कार्य करूनही पक्षात न्याय मिळत नसल्याने पिंगळे यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती.

अजित पिंगळेंचा भाजपमध्ये प्रवेश
अजित पिंगळेंचा भाजपमध्ये प्रवेश
author img

By

Published : Feb 28, 2020, 4:21 AM IST

उस्मानाबाद - शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अजित पिंगळे यांची ओळख होती. मात्र, प्रामाणिक कार्य करूनही पक्षात न्याय मिळत नसल्याने पिंगळे यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी लक्षणीय मतेही मिळवली होती.

पिंगळेंसह अनेक गावचे सरपंच, चार शिवसेना सर्कल प्रमुख यांनी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे सुजितसिंह ठाकूर, राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे हेदेखील उपस्थित होते.

अजित पिंगळेंचा भाजपमध्ये प्रवेश

निवडणुकीनंतर पिंगळे सेनेत राहावेत यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केला होता अशी चर्चा होती. त्यातच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेत अजित पिंगळेयांचा पक्षप्रवेश घडवून आणला. त्यामुळेच हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी आणि आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.