ETV Bharat / state

पंतप्रधानांकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करणार - शरद पवार - शरद पवार लेटेस्ट न्यूज

आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन पंतप्रधानांकडे शेतकऱ्यांना मदतीची मागणी करणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले. उमरगा लोहारा परिसरातील नागरिकांनी भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात केलेली असून त्याच पद्धतीने या निसर्गाच्या संकटावरही तुम्ही मात कराल, हा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Oct 18, 2020, 10:57 PM IST

उस्मानाबाद - राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील नुकसानस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आज (रविवार) उस्मानाबादचा दौरा केला. सुल्तानी संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारसोबत केंद्राचीही मदत मागणार असल्याचे सूतोवाच पवारांनी केले. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे आपण पाहिले असून त्यासाठी राज्य सरकार मदत करेल. परंतु त्याला मर्यादा असल्याचेही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे या भागातील आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन पंतप्रधानांकडे शेतकऱ्यांना मदतीची मागणी करणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले. उमरगा लोहारा परिसरातील नागरिकांनी भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात केलेली असून त्याच पद्धतीने या निसर्गाच्या संकटावरही तुम्ही मात कराल हा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

शरद पवार

दौऱ्यादरम्यान चोरांचा सुळसुळाट -

शरद पवारांच्या दौऱ्यादरम्यान चोरांचा सुळसुळाट झाल्याचे पाहायला मिळाले. उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची गळ्यातील सोन्याची साखळी चोरीला गेली असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. आमदारांच्या सोन्याच्या साखळीबरोबरच जिल्ह्यातील एका प्रमुख अधिकाऱ्यांच्या खिशातील पैशाचे पाकीटही चोरीला गेल्याची माहिती आहे. मात्र, या पाकिटासंदर्भात खातरजमा करता आलेली नाही.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा -

शरद पवारांनी वारंवार सांगूनही सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तयार नव्हते. कोरोनाच्या अनुषंगाने सर्वांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगितले जात आहे. मात्र, पवारांचा आदेश कार्यकर्त्यांनी चक्क पायदळी तुडवली असल्याचे पाहायला मिळाले. तुळजापूर लोहारा उमरगा कामठा उजनी या गावांना भेटी देत शेतकऱ्यांसोबत संवाद साधत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान शरद पवारांचा मास्क शक्यतो नाकाखाली आणि गळ्यात अडकवलेला होता. काही दिवसांपूर्वी पवारांनी सिरम इन्स्टिट्यूटमधून कोरोनाची लस घेतली असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र, या बातमीचे खंडन करत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीची लस आपण घेतली असल्याचे पवारांनी सांगितले होते.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसांत तू तू मैं मैं -

शरद पवार हे नुकसान झालेल्या भागातील दौरा आटोपून तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यासाठी सुरुवात केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकर यांच्यासह इतरही काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीसाठी निघाले. मात्र, त्यांना विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवले. त्यानंतर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये आतमध्ये जाण्यासाठी 'तू तू मै मै' झाल्याचे पाहायला मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.