ETV Bharat / state

मंदिरे तर उघडली; निर्बंध कायम असल्यामुळे मंदिर प्रशासनावर पुजारी नाराज - तुळजाभवानी तुळजापूर पुजारी नाराज

आपला देश पारतंत्र्यात असतानाही अशा महामारी आल्या होत्या. मात्र, त्यावेळीही मंदिरे आणि पुजाविधी सुरू होते. स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांनीही धार्मिक भावना लक्षात घेऊन सर्व विधी करण्यास परवानगी दिली होती, असा इतिहासाचा दाखला या पुजाऱ्यांनी दिला.

tuljapur
तुळजाभवानी, तुळजापूर (संग्रहित)
author img

By

Published : Nov 16, 2020, 5:44 PM IST

उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच देशभरासह राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. तब्बल आठ महिने राज्यातील सर्व प्रमुख धार्मिकस्थळे बंद होती. मात्र, आज (सोमवारी) पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. येथील तुळजाभानीच्या दर्शनासाठी येणारे भाविक पूजाअर्चा करतात. यात अभिषेक, जागरण-गोंधळ, सिंहासन, परडी भरवणे, जोगवा मागणे तसेच इतर 16 प्रकारच्या पूजा केल्या जातात. मात्र, कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता गर्दी टाळण्यासाठी या सर्व पुजेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. भाविकांना फक्त तुळजभवानीचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे पुजाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी मंदिर अभ्यासक नागनाथभाऊ भांजी यांच्याशी साधलेला संवाद.

काय म्हणाले पुजारी?

आपला देश पारतंत्र्यात असतानाही अशा महामारी आल्या होत्या. मात्र, त्यावेळीही मंदिरे आणि पुजाविधी सुरू होत्या. स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांनीही धार्मिक भावना लक्षात घेऊन सर्व विधी करण्यास परवानगी दिली होती, असा इतिहासाचा दाखला या पुजाऱ्यांनी दिला. तसेच हे प्रशासन फक्त नियमावर बोट ठेऊन कारभार हाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा - विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरुवात; चेन्नईतील भक्तांना मिळाला सर्वप्रथम दर्शनाचा मान

मुलांना आणि वृध्दांना ठेवायचे कुठे?

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक सहकुटुंब तुळजापूर येथे दाखल होतात. मात्र, संक्रमण टाळण्यासाठी लहान मुलांना आणि वृध्दांना मंदिरात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जर सोबत लहान मुले असतील तर त्यांना एकटे कुठे सोडायचे? असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आहे. तसेच वृध्दांबाबतीतही असे प्रश्न भविकांसमोर निर्माण झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.