उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील रामपूर येथे ९ लाख रुपयांचा गांजा आढळला. आज सकाळी ( शुक्रवार) ही घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून, गांजा जप्त केला आहे. गांजाचे वजन करुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
रामपूर पाटीजवळ येळी शिवारात गांजाची ६८ बंद पॉकेट सापडली. या गांज्याचे वजन १४४ किलो आढळून आले. अज्ञात आरोपींनी पोत्यात पॅक केलेली गांजांची पॉकेट हणमंत सजगुरे यांच्या शेतात टाकली होती. सजगुरे हे शेताकडे गेले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच पोलिसांनी याबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. यावेळी त्यांना ६८ गांजाचे पॉकेट आढळून आले. सदरील पॉकेटचे वजन केले असता १४४ किलो गांजा असल्याचे दिसून आले. ज्याची अंदाजे किंमत ९ लाख रुपये आहे. या पथकामध्ये हेड कॉन्स्टेबल कांतु राठोड, नागनाथ वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, उत्कर्ष चव्हाण हे होते.