ETV Bharat / state

Cricketer In Trouble : आयपीएलमध्ये मिळाली दीड कोटींची किंमत.. उस्मानाबादच्या हंगरगेकरवर फसवणुकीचा आरोप - Board Of Cricket Control India

आयपीएल खेळाडूंच्या लिलावामध्ये उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर याला दीड कोटींची किंमत मिळाली. अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचाही तो भाग आहे. मात्र हाच राजवर्धन आता अडचणीत सापडला आहे. वय लपवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

राजवर्धन हंगरगेकर
राजवर्धन हंगरगेकर
author img

By

Published : Feb 18, 2022, 9:11 PM IST

Updated : Feb 19, 2022, 6:37 AM IST

उस्मानाबाद : नुकत्याच झालेल्या अंडर 19 क्रिकेट विश्वकप ( Under-19 Cricket World Cup ) विजेता संघाचा भाग असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर ( All-rounder Cricketer Rajvardhan Hangargekar ) हा अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर वय लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार भारतीय नियामक क्रिकेट मंडळाकडे ( Board Of Cricket Control India ) करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयकडे लेखी तक्रार केली आहे.

विभागीय चौकशीची शक्यता

ओमप्रकाश बकोरिया यांनी आपल्या तक्रारीत काही पुरावे देखील सादर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजवर्धन याची विभागीय चौकशी होऊ शकते. राजवर्धन उस्मानाबादच्या तेरणा पब्लिक स्कुलमध्ये शिकलेला आहे. पहिली ते सातवीपर्यंत त्याची शाळेत 10 जानेवारी 2001 अशी जन्मतारीख होती. तर आठवीत 10 नोव्हेंबर 2002 अशी करण्यात आली, असं आपल्या तक्रारीत ओमप्रकाश यांनी नमूद केलं आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल गुप्ता यांनी देखील याबाबतची पृष्टी केल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे नुकतंच झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप दरम्यान राजवर्धनचं वय 21 होतं, जे नियमबाह्य आहे, असं सुद्धा तक्रारीत सांगण्यात आलं आहे.

अंडर19 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करत आला प्रकाशझोतात

वेस्ट इंडिज येथे झालेल्या अंडर19 वर्ल्ड कप स्पर्धेत राजवर्धनने भारतीय संघात जागा मिळवली होती. या दरम्यान त्याने 5 सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. तर एका सामन्यात फलंदाजीत करत असताना एका षटकात 3 षटकार ठोकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. राजवर्धन हा एकटा भेदक गोलंदाजीमुळे फलंदाजांना अडचणीत टाकत होता. 140 च्या गतीने तो गोलंदाजी करत असल्याने त्याच्याकडे अपेक्षेने पाहिले जात होते.

आयपीएल लिलावात चेन्नईने राजवर्धनसाठी दीड कोटी मोजले

भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जने वेळीचं राजवर्धनला हेरले. नुकतंच झालेल्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने त्याला दीड कोटी रुपयात खरेदी केले आहे. आपला आयडॉल धोनीच्या संघात खेळण्याची संधी मिळत असल्याने राजवर्धन आनंदी होता. मात्र या आनंदात विरजन पडतो की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

आरोप सिद्ध झाल्यास होऊ शकते बंदीची कारवाई

यापूर्वी देखील अंडर 19 संघातील खेळाडूंवर वय लपवल्याचे आरोप झाले आहे. काहींवर यामुळे संघातुन बाहेर राहण्याची नामुष्की ओढवली होती. यापूर्वी महाराष्ट्रातीलचं अंकित बावणे या खेळाडूवर वय लपवल्याच्या कारणामुळे वर्ल्ड कपच्या संघातून बाहेर पडावं लागलं होतं. तर काहींवर काही वर्षे बंदीची देखील कारवाई करण्यात आली होती. राजवर्धनवरील आरोप सिद्ध झाल्यास त्याच्यावर देखील कारवाई होऊ शकते. अशात दीड कोटीत गेलेल्या चेन्नई संघातून देखील त्याला बाहेर पडावं लागेल की काय असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

‘महाराष्ट्राचा युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राज्यवर्धन हंगर्गेकर याने खोट्या वयाचा वापर करून वयोगट स्पर्धेत खेळल्याचे आम्हाला समजले होते. त्या पाश्र्वभूमीवर हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या या खेळाडूच्या जन्मतारखेची चौकशी करण्याची जबाबदारी आम्ही धाराशीवचे सीईओ राहुल गुप्ता आणि आमच्या तेथील जिल्हा क्रीडा अधिकारी सारिका काळे यांच्यावर सोपविली होती. त्यांनी केलेल्या तपासात राज्यवर्धनने वयचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनलाही (एमसीए) आम्ही बीसीसीआयला पाठविलेल्या पत्राची प्रत दिलेली आहे.

– ओमप्रकाश बकोरिया (क्रीडाआयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य)

Last Updated : Feb 19, 2022, 6:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.