ETV Bharat / state

'शासकीय सेवेत घ्या', उस्मानाबादमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचे आमरण उपोषण

author img

By

Published : Jul 23, 2019, 10:26 PM IST

होमिओपॅथिक पदवी घेऊन अनेकांनी ग्रामीण भागात स्वतःला रुग्णसेवेत वाहून घेतले आहे. मात्र, अद्यापही होमिओपॅथिक उपचार प्रणालीला शासनाकडून आधार मिळाला नाही.

'शासकीय सेवेत घ्या', उस्मानाबादमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचे आमरण उपोषण

उस्मानाबाद - शहरी भागासह ग्रामीण भागातही आरोग्य सेवा देणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी गेल्या 2 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी हे उपोषण सुरू सुरू करण्यात आले आहे.

होमिओपॅथिक पदवी घेऊन अनेकांनी ग्रामीण भागात स्वतःला रुग्णसेवेत वाहून घेतले आहे. मात्र, अद्यापही होमिओपॅथिक उपचार प्रणालीला शासनाकडून आधार मिळाला नाही. अगदी नर्सिंग पदवी घेतलेल्यांनाही शासकीय रुग्णालयांमध्ये सेवेत घेतले जाते. परंतु, होमिओपॅथिक डॉक्टरांना शासनाकडून चांगली वागणूक मिळत नसल्याची या डॉक्टरांची तक्रार आहे.

शासनाने सामुदायिक आरोग्य अधिकारी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदासाठी 5 हजार 716 जागा जाहीर केल्या आहेत. तेव्हा ही सदरील भरती प्रक्रिया थांबविण्यात येऊन यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचा समावेश करावा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, अशा विविध मागण्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होमिओपॅथिक डॉक्टरांनी
आमरण उपोषण सुरु केले आहे.

Intro:शासकीय सेवेत घ्या; होमिओपॅथिक डॉक्टरांचे अमरण उपोषण

उस्मानाबाद - शहरी भागासह ग्रामीण भागातही आरोग्य सेवा करणारे होमिओपॅथिक डॉक्टरांनी गेले दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू असून होमिओपॅथिक पदवी घेऊन अनेकांनी ग्रामीण भागात रुग्णसेवेत वाहून घेतले आहे मात्र अद्यापही होमिओपॅथिक उपचार प्रणालीला शासनाकडून आधार मिळाला नाही अगदी नर्सिंग पदवी घेतलेल्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये सेवेत घेतले जाते परंतु आत्तापर्यंत होमिओपॅथिक डॉक्टरांना शासनाकडून सपत्नीक पणाची वागणूक मिळत असल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय आरोग्य सेवेत कायम करून घेण्यात यावे यासाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने दिली आहे. मात्र तरीही होमिओपॅथी डॉक्टरांकडे दुर्लक्ष केली असून आता शासनाने सामुदायिक आरोग्य अधिकारी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदासाठी 5716 जागा जाहीर केल्या आहेत सदरील भरती प्रक्रिया थांबविण्यात येऊन यात होमिओपॅथिक डॉक्टरांचा समावेश करावा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती द्यावी अशा विविध मागण्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होमिओपॅथिक डॉक्टरांनी अमरण उपोषण सुरु आहे

Body:यात pkg बनवून पाठवत आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.