उस्मानाबाद - जिल्ह्यातील हिप्परगा येथे गुढीपाडव्यानिमित्त अनोखी यात्रा भरते. यापुर्वी श्री नृसिंह देवाची गावातून टाळ, मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते. तर या मिरावणुकीत गावातील भाविक ओल्या कपड्याने दंडवत घेतात तर काही भाविक पहाटेच्या वेळीच दंडवत घेतात.
यात्रेप्रसंगी गावात सर्वत्र गुढी उभारली जाते. गुढीपाडवा हा एक भारतीय सणापैकी एक महत्वाचा सण समजला जातो. तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हिप्परगा येथे सोवळ्यात नृसिंह देवतेची मूर्ती मंदिरात आणल्यानंतर प्रथम दंडवत घेतलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जातो. गावातील व आसपासच्या गावातील लोक नृसिंह मंदिरात भक्तीभावाने येतात. ही जत्रा सलग ३ दिवस चालते. तीन दिवसात भजन, कीर्तन ,शोभेच्या दारूची आतिषबाजी, फेस्टिव्हल असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.