उस्मानाबाद - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत, असे असले तरीही विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबला नाहीये. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांनी आणि खासगी ट्युशन्स चालकांनी व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून शिकवणी सुरू केली आहे.
लोहारा तालुक्यामध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी शिकवण्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरू आहेत. नववी उत्तीर्ण होऊन 10 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या लोहारा येथील विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडून व्हाट्सऍपचा ग्रुप बनवला गेलाय आणि त्यात दररोज विद्यार्थ्यांना असायमेन्ट दिल्या जातात, त्याचे दररोज शिक्षकांकडून परिक्षण केले जाते. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवरती त्यांचे पालक ही आहेत. जोपर्यंत कोरोनाचे संकट संपत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचा अशा पद्धतीनेच अभ्यास घेतला जाणार आहे. त्यामुळे व्हॉट्सऍप अभ्यासाचे पालकांकडून कौतुक होत आहे.