ETV Bharat / state

उस्मानाबाद : दूषित पाण्यामुळे बंद पडली डायलिसिस सेवा, रुग्णांची गैरसोय - service

डायलिसिस करण्यात येणाऱ्या रुग्णांना थंडी आणि ताप याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावरील डायलिसिसचे उपचार थांबविण्यात आले.

उस्मानाबाद : दूषित पाण्यामुळे बंद पडली डायलिसिस सेवा, रुग्णांची गैरसोय
author img

By

Published : May 4, 2019, 1:10 PM IST

उस्मानाबाद - जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा मागील तीन दिवसांपासून बंद आहे. डायलिसिससाठी लागणारा आर.ओ. प्लांट अचानक बंद पडला. या प्लांटमधून दूषीत पाणी येत असल्याने रुग्णालयातील डायलिसिस सेवा बंद करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : दूषित पाण्यामुळे बंद पडली डायलिसिस सेवा, रुग्णांची गैरसोय

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दररोज कमीत कमी १२ रुग्ण डायलिसिस करण्यासाठी येतात. मंगळवारी सहा रुग्णांची डायलिसिस करणे सुरू असताना अचानक सहा पैकी पाच रुग्णांना थंडी आणि ताप याचा त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांच्यावरील डायलिसिसचे उपचार थांबविण्यात आले. डायलिसिससाठी अशुध्द पाणी वापरल्याने रुग्णांना त्रास झाला.

आज जिल्हा शल्यचिकित्सक राजकीय लांडे यांनी दुरुस्ती विभागाला संपर्क साधला. संबंधित इंजिनीअरना बोलावले. डायलिसिस मशीन व शुद्ध पाणीपुरवठा करणारे मशिन याची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.

डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात खासगी रुग्णालयात पाठवत येत आहे. या रुग्णांचा बाहेरील रुग्णालयातील खर्च हा जिल्हा रुग्णालयामार्फत देण्यात आहे. आज जिल्हा रुग्णालयातील सर्व मशनरी दुरुस्त करण्यात येईल असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.

Intro:दूषित पाण्यामुळे बंद पडले डायलेसि

डायलेसिस साठी लागणारा आरोप प्लांट अचानक बंद पडला या प्लांट मधून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे डायलिसिसच्या मशनरी गेल्या तीन दिवसापासून बंद पडल्या आहेत या डायलिसिसच्या मशनरी बंद पडल्याने गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे डायलिसिस करता आलेली नाही उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दररोज कमीत कमी 12 रुग्ण डायलेसिस करण्यासाठी येतात मंगळवारी सहा रुग्णांची डायलिसिस करणे सुरू असताना अचानक सहा पैकी पाच रुग्णांना थंडीचा आणि ताप याचा त्रास होण्यास सुरुवात झाली त्यामुळे त्यांच्यावरील डायलिसिसचे उपचार थांबविण्यात आली त्यानंतर तेथेच कर्मचाऱ्याला डायलिसिस साठी लागणारी पाणी शुद्धीकरण करणाऱ्या प्लांट बंद पडला आहे आणि यातूनच दूषित पाणीपुरवठा झाला रुग्णांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाला त्यामुळे रुग्णांना ताप थंडी असे आजार सुरू झाले त्यामुळे जिल्हा रुग्णालयात डायलिसिस करणे बंद करण्यात आले होते मात्र आज जिल्हा शल्यचिकित्सक राजकीय लांडे यांनी दुरुस्ती विभागाला संपर्क साधून संबंधित इंजिनीअरना पाचारण करून डायलेसिस मशनरी व शुद्ध पाणीपुरवठा करणारे मशिदीची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येत आहे अशी माहिती दिली त्याचबरोबर त्यांनी या डायलिसिस साठी येणाऱ्या रुग्णांना आम्ही तात्पुरत्या स्वरूपात खाजगी रुग्णालयात पाठवत असून या रुग्णांचा बाहेरील रुग्णालयातील खर्च हा आम्ही जिल्हा रुग्णालयामार्फत करत असून आजच्या आज जिल्हा रुग्णालयातील सर्व मशनरी दुरुस्त करण्यात येईल असे सांगितले

Body:या सोबतच vis व byte जोडत आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.