उस्मानाबाद - महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग मंदिर व वडगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हे जिल्ह्यातील प्राचीन शिवमंदिर आहे. तर, माणकेश्वर येथे हेमाडपंथी शिव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
रामलिंग येथील शिव मंदिरात प्रभू श्री राम यांनी वनवासात असताना येडशी येथील संगमात स्नान करून शिवलिंगाची पूजा केली होती, म्हणून भगवान शंकर यांचे हे तीर्थक्षेत्र रामलिंग या नावाने प्रसिद्ध झाले. सीताहरणाच्या वेळी या दंडकरण्यातून राम-लक्ष्मण यांचा संचार झाला अशी अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे येडशी येथील रामलिंग मंदिर त्याचबरोबर वडगाव येथील सिद्धेश्वर मंदिर व हेमाडपंथी मंदिर असलेले मानकेश्वर मंदिर आज महाशिवरात्रीमुळे फुलून गेले. तर, जिल्ह्यातील लहान मोठे शिव मंदिरातदेखील भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.